२१ व्या मजल्यावर बचावाचा थरार

२१ व्या मजल्यावर बचावाचा थरार

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : माजिवडा पेट्रोलपंपसमोरील एका इमारतीमध्ये रंगकामाकरिता उभारलेल्या उद्वाहिकेचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे एकविसाव्या मजल्यावर अडकलेल्या कामगाराची तब्बल १५ तासांनी सुटका करण्यात आली. या घटनेची माहिती ११ तासांनंतर महापालिकेला मिळाली होती. त्यानंतर अवघ्या चार तासांतच बचावकार्य राबवताना पालिकेने कामगाराची सुटका केली होती.
कोलकाताचा मूळ रहिवासी असलेला आलो हुसेन (३९) हा मंगळवारी (ता. ८) दुपारी इमारतीच्या रंगकामासाठीच्या उद्वाहिकेतून एकविसाव्या मजल्यावर जात होता. याचदरम्यान विद्युतपुरवठा खंडित झाल्याने हुसेन अडकला होता. त्याचे सहकारी आजूबाजूच्या मजल्यावरून तब्बल १५ तास त्याला धीर देत होते, मात्र याबाबतची माहिती बुधवारी (ता. ९) मध्यरात्री २ वाजता ठाणे पालिकेच्या बाळकुम अग्निशमन दलाला देण्यात आली. महावितरणकडून विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे उद्वाहिका बंद पडली होती. त्यामुळे तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण संप असल्याने कोणी येऊ शकत नसल्याचे कारण देण्यात आले, पण ही घटना संवेदनशील असल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी राठोड यांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर तत्काळ दोन कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर खासगी विद्युतपुरवठ्याची व्यवस्था केल्यानंतर कामगाराला सुखरूप खाली उतरवण्यात आले.
------------------------------------
संकटकाळात येथे संपर्क साधा
या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. अशाप्रकारे कोणी अडकल्यास किंवा कोणत्याही आपत्तीची घटना घडल्यास तत्काळ ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ०२२-२५३७१०१० या हेल्पलाइनवर किंवा ८६५७८८७१०१/ ८६५७८८७१०२ या क्रमांकावर संपर्काचे आवाहन केले आहे.
---------------------------------------
या घटनेची माहिती मिळताच कोणताही विलंबाशिवाय २१ व्या मजल्यावरील कामगाराला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर चार तासांनी त्या कामगाराला सुखरूप खाली आणण्यात यश आले. याबाबतची माहिती उशिरा मिळाल्याने बचावकार्याला उशीर झाला
- यासिन तडवी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com