थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

दमदार पावसामुळे भातलावणीच्या कामाला प्रारंभ
रोहा (बातमीदार) ः गेल्या आठ दिवसांपासून भातलावणीसाठी योग्य प्रमाणात पाऊस पडत असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात भातलावणीच्या कामास दमदार प्रारंभ झाला आहे. मागील आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे भातलावणीसाठी रोपांची योग्य प्रमाणात वाढ झाली आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त साधून भातलावणीच्या कामास सुरुवात केली आहे. यंदा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आधुनिक शेतीला पसंती दिली जात आहे. मजुरांचा तुटवडा, बियाण्यांचा वाढता खर्च आदींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्‍यामुळे आधुनिक शेतीला प्राधान्य दिले जात आहे. रोहा तालुक्‍यात मागील काही दिवसांपासून पाऊस चांगला झाल्याने भाताची रोपे योग्य प्रमाणात वाढली आहेत. त्‍यामुळे प्रत्‍येक क्षेत्रात भातलावणीला सुरुवात झाली आहे.
............
वाढदिवसानिमित्त शालोपयोगी वस्तूंचे वाटप
माणगाव (बातमीदार) ः केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू चेअरमन तथा रायगड- रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे मोफत वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, युवक अध्यक्ष शादाब गैबी, लोणशी सरपंच सिद्धेश पालकर, उपसरपंच मच्छिंद्र म्हस्के, गोरक्षनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक भोरावकर गुरुजी, शाळेचे शिक्षक व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील लोणशी उर्दू, ढालघर, लोणशी, लोणशी आदिवासीवाडी, जावळी हायस्कूल, मुगवली, जावळी, गारळ आदी जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप व मुगवली, ढालघर, जावळी नवीन वसाहत, गारळ, लोणशी मोहल्ला, लोणशी आदिवासीवाडी, जावळी, लोणशी आदी अंगणवाडी शाळांना खाऊ वाटपदेखील करण्यात आले.
............
चौक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर पूजा हातमोडे
खालापूर (बातमीदार) ः चौक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर भारतीय जनता पार्टीच्या पूजा हातमोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. चौक ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आहे. तर सरपंचपदी रितू ठोंबरे आहेत. उपसरपंच सुभाष पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर पूजा हातमोडे यांचा केवळ एकच अर्ज आला होता. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूरचे अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, सुहास कदम, सचिन मते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी उत्सवाच्या अनुषंगाने नागरिकांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे नवनिर्वाचित उपसरपंच पूजा हातमोडे यांनी सांगितले.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com