सरपंच पदासाठी नव्याने आरक्षण

सरपंच पदासाठी नव्याने आरक्षण

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : रायगड जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाने १३ जून रोजी याबाबत अधिसूचना काढत मंगळवारी (ता. १५) सरपंचांचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही करावी, असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरक्षणाची प्रक्रिया पुन्हा राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबरमध्येच संपला असून, रखडलेल्या आरक्षणामुळे निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. नव्याने होणाऱ्या सोडतीमधून रखडलेल्या निवडणुकांचाही मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.
निवडणुका न झाल्याने जिल्‍ह्यातील सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकीय कारभार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या सर्व अधिसूचना रद्द करून २०२५-२०३० या कालावधीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. तालुकानिहाय सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तालुकानिहाय सरपंचपदाची आरक्षण अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदांची जिल्हानिहाय विभागणी दर्शविली आहे. यात महिलांसाठी एकूण ५० टक्के जागा राखीव, तर इतर मागासवर्गीय घटकांसाठी २७ टक्के जागा आरक्षित असणार आहेत. यापूर्वीही रायगडमध्ये सरपंचपदाची आरक्षण सोडत झाली होती, परंतु काही ठिकाणी वादांमुळे ती तहकूब करण्याची वेळ आली होती. आता नवीन अधिसूचनेनुसार १५ जुलैला सर्व तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

इच्छुकांची मेहनत वाया
आतापर्यंत दोन वेळा सरपंचपदासाठी आरक्षण काढण्यात आले होते. ते रद्द झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची मेहनत वाया गेली आहे. आता पुन्हा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या वर्गाचे आरक्षण असेल, हे निश्चित नसल्याने इच्छुक उमेदवार योग्य आरक्षण पडण्यासाठी देव पाण्यात ठेवून आहेत. निदान आताचे आरक्षण कायम ठेवून सरपंचपदाच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सरपंचपदाचे आरक्षण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. मागील वेळेला झालेल्या आरक्षणानंतर ओबीसी नेते न्यायालयात गेले होते. नव्या आरक्षणात वाढलेल्या ओबीसी टक्क्याचा विचार केला जाणार आहे.
- राजा केणी, शिवसेना जिल्हाप्रमुख


असे असेल सरपंचपदाचे आरक्षण
अलिबाग ः ग्रामपंचायती-६२, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला ०, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ६, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ९, महिला ८, सर्वसाधारण जागा-खुला १७, महिला १६.

मुरूड ः ग्रामपंचायती-२४, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला ०, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ३, महिला २, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ३, महिला ४, सर्वसाधारण जागा खुला ६, महिला ५.

पेण ः ग्रामपंचायती-६४, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला ०, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ७, महिला ७, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ८, महिला ९, सर्वसाधारण जागा खुला १६, महिला १६.

पनवेल ः ग्रामपंचायती-७१, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला २, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ६, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ९, महिला १०, सर्वसाधारण जागा खुला २०, महिला १८.

उरण ः ग्रामपंचायती-३५, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला ०, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला २, महिला १, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ४, महिला ५, सर्वसाधारण जागा खुला ११, महिला ११.

कर्जत ः ग्रामपंचायती- ५५, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ८, महिला ८, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ८, महिला ७, सर्वसाधारण जागा खुला १०, महिला १२.

खालापूर ः ग्रामपंचायती-४५, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ५, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ६, महिला ६, सर्वसाधारण जागा खुला ११, महिला १०.

रोहा तालुका- ग्रामपंचायती-६४, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला २, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ५, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ९, महिला ८, सर्वसाधारण जागा खुला १७, महिला १७.

सुधागड ः ग्रामपंचायती - ३३, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला ०, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ६, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ४, महिला ५, सर्वसाधारण जागा खुला ७, महिला ५.

माणगाव ः ग्रामपंचायती-७४, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला २, महिला २, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ३, महिला ४, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला १०, महिला १०, सर्वसाधारण जागा खुला २२, महिला २१.

तळा ः ग्रामपंचायती-२५, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला २, महिला २, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ४, महिला ३, सर्वसाधारण जागा खुला ५, महिला ७.

महाड ः ग्रामपंचायती-१३४, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला ३, महिला ३, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ४, नारिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला १८, महिला १८, सर्वसाधारण जागा खुला ४१, महिला ४२.

पोलादपूर ः ग्रामपंचायती-४२, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला २, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला २, महिला १, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ५, महिला ६, सर्वसाधारण जागा खुला १३, महिला १२.

श्रीवर्धन ः ग्रामपंचायती-४३, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला ०, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ३, महिला ३, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ६, महिला ६, सर्वसाधारण जागा खुला ११, महिला १३.

म्हसळा ः ग्रामपंचायती-३१, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला १, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला २, महिला २, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ६, महिला ५, सर्वसाधारण जागा खुला १०, महिला १२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com