सानपाड्याला नागरी समस्यांचा विळखा
सानपाड्याला नागरी समस्यांचा विळखा
जुईनगर, ता. १० (बातमीदार) : सानपाड्यात नागरी समस्यांमुळे स्थानिकांची गैरसोय होत आहे. रस्त्यावरील खड्डे, कचरा, पदपथावर साचलेला राडारोडा, पाण्याची डबकी आदीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येथील नागरी समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात, अशी मागणी सानपाडावासीयांकडून करण्यात येत आहे.
सानपाडा गावात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. गावात काही सखल भागात थोड्या पावसानेदेखील पाणी साचून राहते. महापालिकाच पाण्याचे साठे करू नका असे सांगत असताना, येथे मात्र ठिकठिकाणी पाण्याची डबकी पाहायला मिळत आहेत. गावातील दत्तमंदिर दिशेकडील रस्त्यावर खड्डे पडल्याने ठाणे-बेलापूर मार्गावर जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही खड्डे ब्लॉकने बुजवण्याची प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. रस्त्याच्या मधोमध फुटभर खड्डयात गाड्या आदळून चालकांच्या पाठीला इजा होऊ लागली आहे. त्यातच सानपाडा येथील अनेक पदपथावर शेवाळ वाढले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी झाडांचे खोड, फांद्या, पानांचा कचरा तसेच इतर राडारोडा अवैधरित्या टाकून देण्यात आला आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पदपथ झाकून गेले आहेत. त्यामुळे चालताना अडथळा होत आहे. शिवाय शैवाळामुळे निसरड्या पदपथावरून चालताना घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याने परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.