व्यसन मुक्त समाज विषयावर माजी न्यायमूर्तींचे मार्गदर्शन
व्यसनमुक्त समाज विषयावर माजी न्यायमूर्तींचे मार्गदर्शन
खारघर, ता. ९ (बातमीदार) : संघर्ष समितीच्या वतीने खारघरमध्ये दारूमुक्त खारघर ते व्यसनमुक्त समाज या विषयावर एकदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, महिला आणि आदिवासी हक्क कार्यकर्त्या वसुधा सरदार आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
राज्य शासनाने खारघर शहर दारूमुक्त घोषित करावे, यासाठी परिसरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने निर्माण केलेल्या संघर्ष समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. खारघर दारूमुक्तीसाठी अनेक वेळा मोर्चा, आंदोलने आणि शासनाकडे पत्रव्यवहार केला जात आहे. दरम्यान, नुकतेच विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खारघर विभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. खारघर शहर दारूमुक्तीसंदर्भात पुढील रणनीती ठरवण्यासाठी आणि खारघरवासीयांमध्ये एकता असावी, हा उद्देश समोर ठेवून रविवारी (ता. १३) खारघर सेक्टर चारमधील ए. सी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात दारूमुक्त खारघर ते व्यसनमुक्त समाज या विषयावर एकदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनात खारघरला कायमस्वरूपी दारूमुक्त घोषित करण्यासाठी समाजाची एकजूट, व्यसनमुक्ती समाजासाठी ठोस उपाययोजना व जनआंदोलन उभे करणे, राज्यभरातील सामाजिक संस्थाना एकत्र आणणे आणि संमेलनात चर्चा करून ठराव मंजूर करणे आदी विषयवार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, महिला आणि आदिवासी हक्क कार्यकर्त्या वसुधा सरदार, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे संयोजक अविनाश पाटील, मानसशास्त्र आणि लाइक स्किल प्रशिक्षक तेजल खेडकर आणि अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अजित मगदूम आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. हे संमेलन सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संघर्षच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.