पीक विम्यासाठी फार्मर आयडी आणि ई - पीक पाहणी अनिवार्य;

पीक विम्यासाठी फार्मर आयडी आणि ई - पीक पाहणी अनिवार्य;

Published on

पीक विम्यासाठी फार्मर आयडी आणि ई-पीक पाहणी अनिवार्य
कृषी विभागाकडून ३१ जुलै अंतिम मुदत
जव्हार, ता. ९ (बातमीदार) ः येथील शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. यात अवकाळी पाऊस, किडीचा प्रादुर्भाव, निसर्गाचा ढासळणारा समतोल या सगळ्यांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे शासनाची पीक विमा योजना जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार ठरत आहे; मात्र पीक विम्यासाठी आणि ई-पीक पाहणीकरिता फार्मर आयडी अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ जुलै अंतिम तारीख असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी विमा हप्ता भरण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र यंदापासून विमा भरताना शेतकऱ्यांची अधिकृत फार्मर आयडी व ई-पीक पाहणी सिस्टिममध्ये संबंधित पिकांची नोंद झालेली असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेविना विमा हप्ता स्वीकारला जाणार नाही, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी जयराम अढळ यांनी दिली.
फार्मर आयडी हे शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र असून, त्याच्या आधारे शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना, अनुदान व विमा योजनांचा लाभ निश्चित केला जातो. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमध्ये चुका असून, त्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या कार्यालयांत दुरुस्तीची मागणी वाढली आहे. ई-पीक पाहणीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप अथवा ग्रामसेवक, तलाठ्यांच्या मदतीने ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी न झाल्यास विमा दावा करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ३१ जुलैपूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपले फार्मर आयडी तपासून घ्यावेत आणि पिकांची पाहणी अद्ययावत केल्यास शेतकऱ्यास लाभदायक ठरणार आहे.

शासनाची पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे; मात्र जव्हारसारख्या ग्रामीण भागात विद्युत पुरवठा नेहमी खंडित होणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणे यांसारख्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे ॲग्रीस्टॅक प्रणालीची मदत ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात यावी.
- रवींद्र गवते, शेतकरी

जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढील अनुदान, मदतीसाठी अडथळा टाळण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा विमा हप्ता भरला असतानाही दावे फेटाळले जाऊ शकतात.
- जयराम अढळ, तालुका कृषी अधिकारी, जव्हार

जव्हार तालुका पीक विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी
पिकाचे क्षेत्र
भात - ७,१४५ हेक्टर
नागली - ५,७९७ हेक्टर
उडीद - १,२१७ हेक्टर

पीक विमा संरक्षित रक्कम (प्रतिहेक्टर)
शेतकरी हिस्सा रक्कम

पीक जोखीम स्तर विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता
भात ७०% ६१,००० ४५७.५०
नागली ७०% ३५,००० ८७.५०
उडीद ७०% २५,००० ६२.५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com