पाणी पुरवठ्याची जबाबदारी कंत्राटदारावर
पाणीपुरवठ्याची जबाबदारी कंत्राटदारावर
संवेदनशील भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात कंत्राटी कामगारांची भरती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मुंबई महापालिकेत खासगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. पालिकेच्या विविध खात्यांत कंत्राटदारांकडून कामगार नियुक्त केले जात आहेत. पाणीपुरवठ्याची जबाबदारी खासगी कंत्राटदारांवर सोपविण्यात येणार आहे. संवेदनशील भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पुन्हा कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येणार आहे.
सध्या पालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागातील मोटार लोडर व कचरा संकलनासाठी असणारी वाहने कंत्राटदाराकडून घेण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन व कामगार संघटनांच्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. तरीही पालिका प्रशासनाने मुंबईतील भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात कायमस्वरूपी कामगारांची भरती न करता पुन्हा कंत्राटी कामगार नेमून मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. पाणीपुरवठा विभाग हा संवेदनशील असल्याने याबाबत अनेक शंका कामगार संघटनांकडून घेतल्या जात आहेत.
मुंबई महापालिकेच्या वतीने सात तलावांतील पाणी उचलण्यात येऊन त्या पाण्यावर शहापूर व भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून ते मुंबईकरांना पाठवले जाते. भांडुप संकुलात ९०० दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण करून मुंबईकरांना पुरवले जाते. या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये पंपांची देखभाल करण्यासाठी खासगी कंपन्यांची सेवा घेतली जात आहे. जलशुद्धीकरणासारख्या संवेदनशील विभागांमधील कामगार, कर्मचाऱ्यांची पदे न भरता खासगी कंपनीची सेवा घेतली जात असल्याने हे जलशुद्धीकरण केंद्रातील काम कसे केले जात असेल, याबाबत कामगार संघटनांनी भीती व्यक्त केली आहे.
देखभालीसाठी साडेआठ कोटी
जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल महापालिकेचे कामगार, कर्मचारी नसल्याने खासगी कंपनीकडूनच केली जात असून कंत्राट २६ जून २०२५ मध्ये संपुष्टात आल्याने नवीन कंपनीची निवड केली जात आहे. त्यामुळे आता पुढील तीन वर्षांसाठी नवीन कंत्राटदारांची निवड केली जात आहे. तीन वर्षांच्या देखभालीसाठी विविध करांसह साडेआठ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.