राज्यात समांतर वीज वितरण परवान्याला वीज कामगरांचा विरोध

राज्यात समांतर वीज वितरण परवान्याला वीज कामगरांचा विरोध

Published on

समांतर वीज वितरण परवान्याला विरोध
राज्यातील कामगारांचा बेमुदत संपाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महावितरणचे कार्यक्षेत्र असलेल्या क्षेत्रात खासगी कंपन्यांना समांतर वीज वितरण परवाना देऊ नये, वीज क्षेत्रातील खासगीकरण थांबवा, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज केलेल्या एकदिवसीय संपाला राज्यभरातील वीज कामगारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, खासगी कंपन्यांना समांतर परवाना देण्याची कार्यवाही सुरूच ठेवल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य वीज कामगारांनी दिला आहे.
महावितरणच्या कार्यक्षेत्रात अनेक खासगी भांडवलदारांनी वितरण परवाना मागितला आहे. याबाबत २२ जुलैला सुनावणी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे होणार आहे. तसेच महावितरणने २२९ उपकेंद्रे खासगी कंत्राटदारांना चालविण्यास देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापारेषण कंपनीत २०० कोटींवरील सर्व कंत्राटे खासगी भांडवलदारांना देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यास विरोध करत वीज कामगारांनी आज मुंबईत प्रकाशगड येथील परिमंडळ कार्यालयासह राज्यभरातील बहुतांश वीज कामगारांनी संपात सहभागी होत निषेध नोंदवला. तसेच हा केवळ इशारा असून खासगीकरणाची प्रक्रिया सुरू राहिल्यास बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com