स्‍वच्‍छ रायगडसाठी प्रशासन सरसावले

स्‍वच्‍छ रायगडसाठी प्रशासन सरसावले

Published on

स्‍वच्‍छ रायगडसाठी प्रशासन सरसावले
विशेष मोबाईल ॲपवर अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) ः ग्रामीण भागातील स्वच्छता अभियानाला अधिक गती देण्यासाठी केंद्र शासनातर्फे देशभरात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील गावपातळीवरील स्वच्छताविषयक कामांची पाहणी केंद्रीय समितीकडून करण्यात येणार असून, त्याचबरोबर नागरिकांचे स्वच्छताविषयक अभिप्रायही जाणून घेण्यात येणार आहेत.
यासाठी केंद्र शासनाकडून एसएसटी २०२५ हे ॲप विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी गुगल प्‍ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून त्यामधील प्रश्नावलीला उत्तरे द्यावी. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या देशव्यापी उपक्रमात रायगड जिल्हा अग्रणी ठरावा, यासाठी आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
एसएसटी २०२५ ॲपचा वापर करताना सर्व प्रथम मोबाईल क्रमांक नोंदवावा लागतो. त्यानंतर आलेला ओटीपी टाकून, भाषेची निवड करून सहभाग नोंदवता येतो. या ॲपमध्ये सर्वेक्षणाची माहिती वाचून सर्वेक्षण सुरू करा, या पर्यायावर क्लिक केल्यावर राज्य, जिल्हा, लिंग व वय यासह इतर माहिती भरल्यानंतर एकूण १३ प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. ही प्रश्नावली गावातील शौचालय सुविधा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, खतखड्डा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता यासारख्या स्वच्छता मुद्याशी संबधीत आहे. सहभाग आवश्यक नागरिकांचे सकारात्मक अभिप्राय हे गावाच्या स्वच्छता दर्जावर थेट परिणाम करणारे आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रा.प. सदस्य, गावातील युवक-युवती, महिला मंडळे, शिक्षक, उद्योजक यांनी हे ॲप डाऊनलोड करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जि. प. तर्फे करण्यात आले आहे.
.................
असे करा ॲप डाऊनलोड:
या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य व जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख यांनी योग्य नियोजन करून अधिकाधिक नागरिकांचे अभिप्राय ॲपद्वारे संकलित करावेत, असे आवाहनही पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.
ॲप लिंक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (एसएसटी) २०२५ सिटीझन फीडबॅक ॲप्लिकेशन डाउनलोड कराणे
ttps://play.google.com/store/apps/details?id=com.ssg.abc.ssg

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com