विद्यार्थ्यांना शाळेतच एसटी पासची सुविधा

विद्यार्थ्यांना शाळेतच एसटी पासची सुविधा

Published on

विद्यार्थ्यांना शाळेतच एसटी पासची सुविधा
रांगेत उभे राहण्याचा वाचला त्रास; १३ हजार ११५ विद्यार्थ्यांना लाभ
अलिबाग, ता. १० वार्ताहर ः ग्रामीण भागातून शहरात शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. १६ ते ३० जूनपर्यंत रायगड जिल्ह्यातील १३ हजार ११५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये दैनंदिन पास घेणारे पाच हजार ८२३ विद्यार्थी व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत सात हजार २९२ विद्यार्थिनींना पास वितरित करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज शहरात जावे लागते. त्‍यामुळे त्‍यांना एसटीशिवाय पर्याय नसतो. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून सवलत दिली आहे. त्‍यामुळे एसटीच्या पाससाठी जवळील आगारातील केंद्रावर जाऊन तासनतास रांगेत उभे राहून पास घ्यावा लागतो किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया जातो, मात्र आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही, त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटी कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या आहेत. याअंतर्गत १३ हजार ११५ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी पास वितरित केले आहे. यापैकी शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. याअंतर्गत सात हजार २९२ विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करण्यात आले.

चैकट :
जूनपासून वितरित करण्यात आलेल्या पासची संख्या :
१) महाड विद्यार्थी पास ६४८, अहिल्याबाई होळकर ८३९ - एकूण एक हजार ४८७
२) अलिबाग विद्यार्थी पास ७७२, अहिल्याबाई होळकर पासेस १४२९ - एकूण दोन हजार २०१
३) पेण विद्यार्थी पास १६०४, अहिल्याबाई होळकर १५९७ - एकूण तीन हजार २०१
..................
ऽ विद्यार्थी पास पाच हजार ८२३
ऽ अहिल्याबाई होळकर पासेस ७२९२
ऽ एकूण १३ हजार ११५

चैकट:
ग्रामीण बस फेऱ्या रद्द करू नयेत
जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. लाखो विद्यार्थी एसटी बसने शाळेला जातात. त्यांच्यासाठी विशेष शालेय फेऱ्या एसटीने सुरू केलेल्या आहेत, परंतु विविध कारणांनी काही फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची सायंकाळच्या वेळी मोठी गैरसोय होते, अशा तक्रारी शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बस फेऱ्या रद्द करू नयेत, अशी मागणी करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com