आपत्तीशी यशस्वी सामना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणि प्रमाणित कार्यपद्धती २०२५ या पुस्तिकेचे जुलैमध्ये प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत कार्यपद्धतीमध्ये शासकीय यंत्रणांची जबाबदारी विशद करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात ठाणे महापालिकेमार्फत आपत्ती व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपद्धती २०२५ ही पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये आपत्ती परिस्थिती ओढवल्यास शासकीय यंत्रणांच्या जबाबदारी आहेत. त्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती नमूद आहे. त्यामुळे त्या शासकीय यंत्रणांना जबाबदारीतून अंग काढता येणार नाही. याशिवाय ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आपत्ती परिस्थितीत काही घटनांची २०१६ पासून २०२४ या नऊ वर्षांमधील आकडेवारी तसेच किती पाऊस झाला, महिन्याला सरासरी पाऊस पडला, भरती कधी आहे. त्यामध्ये पाच हजार ४७ वृक्ष उन्मळून पडली आहेत, तर ८५ ठिकाणी स्लॅब पडले असून, ३१ घरे कोसळल्याचे नमूद आहे. त्याचबरोबर एक हजार ३४८ ठिकाणी पाणी तुंबले आहे.
घटनांची आकडेवारी
वर्ष झाडे स्लॅब घर पाणी तुंबणे
२०१६ ३७५ १३ ०१ ०९१
२०१७ ६१५ ०७ ०४ १७७
२०१८ ४८० २० ०७ १४१
२०१९ ७७१ २९ ०३ ३५४
२०२० ५१२ ०१ ०० १३६
२०२१ ६१८ ०३ ०५ १७३
२०२२ ५३७ ०३ ०६ १२०
२०२३ ४६९ ०५ ०२ ०९१
२०२४ ६७० ०४ ०३ ०६५
एकूण ५,०४७ ८५ ३१ १,३४८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.