सफाई कर्मचाऱ्यांना नवी ओळख

सफाई कर्मचाऱ्यांना नवी ओळख

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना एक नवी ओळख मिळावी, यासाठी पालिकेने गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठेकेदारांना दरवर्षी वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करणे बंधनकारक झाले असून, कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील चाप बसणार आहे.
ठाणे पालिका हद्दीत १ सप्टेंबरपासून कंत्राटी सफाई कंत्राटदारांच्या नवीन कंत्राट कालावधीस सुरुवात झाली आहे. स्वच्छतेचा दर्जा चांगला राहावा, यासाठी संबंधित कंत्राटांमध्ये अटी-शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रात २३ गटांमार्फत साफसफाई करण्यात येत आहे. या नव्या नियमानुसार दररोज सकाळी ६ वाजता रस्ते सफाईचे काम सुरू होऊन सकाळी ८.३० वाजेपर्यंत सर्व मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणे अपेक्षित धरण्यात आले. त्याचबरोबर दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील सफाई केली जाणार जात आहे. कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश हा वेगळा ठेवण्यात आला होता. त्यातून महापालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत असलेला कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांची ओळख पटविणे सोपे जात आहे. तसेच कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे.
---------------------
२,३५० कंत्राटी कामगार
ठाणे महापालिकेत कायमस्वरूपी सफाई कामगार २,८८८ मंजूर पदे आहेत. त्यातील २,४४९ पदे भरण्यात आली; तर कंत्राटी कामगारांची संख्या २,३५० एवढी आहे. या कामगारांच्या मार्फत कार्यालये, दवाखाने, रुग्णालये, पालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक रस्त्यांची सफाई, कचरा गोळा करणे, गटारात उतरून गाळ काढणे, अशी कामे करावी लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com