गांजा विक्रीप्रकरणी तिघांना अटक
गांजा विक्रीप्रकरणी तिघांना अटक
भिवंडी, ता. १२ (वार्ताहर) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात सर्रासपणे गांजा विक्री होत आहे. त्याविरोधात कठोर कारवाईचे निर्देश पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर भिवंडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक करीत त्यांच्याकडून १३ लाख ५० हजार ४२८ रुपये किमतीचा २० किलो ६६३ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात नारपोली पोलिसांना यश आले आहे. मंगेश अर्जुन पावरा (वय २९), राकेश छत्तरसिंग पावरा (२५, दोघे रा. शिरपूर, जि. धुळे) व रवींद्र गनदास बारेला (२५, रा. बडवाणी, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कामतघर परिसरातील गणेश मंदिराच्या पाठीमागे, मैत्री पार्क, ब्रम्हानंदनगर या ठिकाणी काही व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकासह गुरुवारी (ता. १०) सकाळी पावणेआठच्या सुमारास कारवाई केली. या वेळी मंगेश पावरा, राकेश पावरा व रवींद्र बारेला हे संशयित आढळून आले. पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील कारची झडती घेतली. यावेळी २० किलो ६६३ ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले. या तिघांविरोधात गुन्हा नोंदवून अटक केली. आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.