पनवेल पालिका २० हजार महिलांचे महिलांच्या सक्षमीकरण करणार

पनवेल पालिका २० हजार महिलांचे महिलांच्या सक्षमीकरण करणार

Published on

पनवेल पालिका करणार महिलांचे सक्षमीकरण
पहिल्या टप्प्यात एक हजार महिलांना देणार प्रशिक्षण
पनवेल, ता. १२ (बातमीदार) ः पनवेल महापालिका महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने लघुउद्योग आणि कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात एक हजार महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच पनवेल पालिका क्षेत्रातील तब्बल वीस हजार महिलांचे सक्षमीकरण करणार असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरण हे केवळ सामाजिक दृष्टीनेच नव्हे तर आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातूनही आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन पालिकेने हा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. या प्रशिक्षणासाठी महापालिकेने अनुभव असलेल्या, पात्र संस्थांकडून बाजारभावानुसार दरपत्रके मागवली असून, प्रशिक्षणक्रमाचे नियोजन सुरू झाले. याद्वारे महिलांना शिवणकला, सौंदर्यप्रसाधन, पाककला, फॅशन डिझायनिंग, संगणक प्रशिक्षण यांसारख्या विविध व्यावसायिक कौशल्यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. यामुळे त्यांना छोट्या उद्योगांचे स्वप्न साकार करता येईल व रोजगार निर्मितीच्या संधीही उपलब्ध होतील.
यामध्ये सहभागी होण्यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक संस्थांना बुधवार (ता. १६) पर्यंत ईमेलवर अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे.

प्रशिक्षणामध्ये ‘या’ उपक्रमांचा समावेश
आरोग्य जागृती, योग आणि मानसिक आरोग्य, रोजगार आणि लघुउद्योग संधी, व्यवसायाचे प्रकार व फ्रीलान्सिंगची माहिती, व्यक्तिमत्त्व विकास, कचरा व्यवस्थापन, कायदे आणि जनजागृती

व्यावसायिक प्रशिक्षण
फॅशन डिझाइन, शिवणकाम, ब्युटीशिअन्स (ॲडव्हान्स कोर्स), बेकरी प्रॉडक्ट तयार करणे, चारचाकी वाहन चालविणे (शिकाऊ परवान्यासह), बांबूपासून विविध उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षण.

महिला सक्षमीकरण हे केवळ सामाजिक दृष्टीनेच नव्हे तर आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातूनही आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन पालिकेने हा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. हा उपक्रम महिलांच्या आत्मविश्वासात भर घालणारा असून, त्यांच्या सशक्तीकरणासाठी प्रभावी टप्पा ठरणार आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल पालिका

महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. महिला सशक्त झाल्या तर समाज सशक्त होतो.
तिच्या प्रगतीतच कुटुंब आणि शहराचा विकास दडलेला असतो. शिक्षण, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास हेच तिच्या सक्षमीकरणाचे खरे शस्त्र आहे. ती केवळ बदलते नाही तर परिवर्तन घडवते. पनवेल क्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांनी पालिकेच्या या योजनेचा लाभ घ्यावा.
- सायली सरक, अध्यक्ष, हिरकणी सामाजिक संस्था, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com