मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून शासकीय योजनांचा आढावा
पालघर, ता. १२ (बातमीदार) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी गुरुवारी (ता. १०) तलासरी पंचायत समितीची भेट देत विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी, प्रगती आणि लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांसह व्यवस्थेचा आढावा घेतला. या दौऱ्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, जलजीवन मिशन, मनरेगा आणि घरकुल योजना यांसारख्या महत्त्वाच्या विभागांबाबत सादरीकरण करण्यात आले.
‘निपुण भारत’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती मांडण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कौतुक केले. अंगणवाडी केंद्रांची स्थिती, महिला बचत गटांचे कार्य, प्राथमिक आरोग्य केंद्रांची कार्यक्षमता आणि आरोग्य सेवा उपलब्धता यासंदर्भातही चर्चा झाली. गावपातळीवर सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी सांगितले, की नवीन तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. या भेटीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांनी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, मनरेगाचे अतुल पारसकर, गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे, गटशिक्षण अधिकारी निमिष मोहिते आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.