जनसुरक्षा विधेयकाला ठाम विरोध : विनोद निकोले

जनसुरक्षा विधेयकाला ठाम विरोध : विनोद निकोले

Published on

जनसुरक्षा विधेयकाला ठाम विरोध : विनोद निकोले
कासा, ता. १२ (बातमीदार) : जनसुरक्षा विधेयक हे कामगार, कष्टकरी व आंदोलन करणाऱ्या घटकांचे हक्क हिरावून घेणारे असल्याचा आरोप करीत आमदार विनोद निकोले यांनी विधानसभेत या विधेयकाला विरोध दर्शविला.

‘मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले असताना, दोन्ही सभागृहांत सत्ताधारी पक्षाला बहुमत असल्यामुळे ते सहज मंजूर होणार असल्याचे स्पष्ट होते. तरीही या विधेयकातील गंभीर त्रुटी लक्षात आणून देत विरोधकांनी ठामपणे विरोध करणे आवश्यक होते,’ असे निकोले यांनी सांगितले. नक्षलवाद संपवणे महत्त्वाचेच आहे; मात्र यासाठी आधीच मकोकासह अनेक कायदे अस्तित्वात आहेत. गडचिरोलीत नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे, अशा परिस्थितीत नव्या विधेयकाची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, ‘कामगारांच्या मागण्यांसाठी आम्ही आवाज उठवत असतो. त्यामुळे आम्हाला संविधानविरोधी ठरविण्याचा प्रयत्न हा चुकीचा आणि लोकशाहीला घातक आहे. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे असंवैधानिक असून, भविष्यात याचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे कामगारांच्या संघटनांच्या हक्कांवर गदा येईल आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हा संविधानाला व कायद्याला मानणारा पक्ष आहे. आम्ही विविध प्रश्नांसाठी आंदोलने करतो, मात्र ती नेहमी कायद्याच्या चौकटीत राहूनच केली जातात. कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि विविध संघटना ह्या सगळ्या संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या आहेत. अशा संघटनांवर सरकारने कारवाई करू नये आणि त्यांचे हक्क हिरावून घेऊ नयेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com