सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा

Published on

सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा
पनवेल, ता. १३ (बातमीदार) : विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून शनिवार (ता. १२) साजरा करण्यात आला. या सोहळ्याला वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बुके नाही तर बुक या संकल्पनेतून विक्रांत पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा केला. सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम पनवेल परिसरामध्ये राबविण्यात आले. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभुदास भोईर यांनी वाहनचालकांना कळंबोली उड्डाणपुलाखाली हेल्मेट वाटप केले. तर नवीन पनवेल येथे टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आसूडगाव आणि नवीन पनवेल येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. खारघर येथे एनएमएमटी बस थांब्याचे लोकार्पण करण्यात आले. के. आ. बांठिया हायस्कूलमध्ये १०वी आणि १२वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. शनी मंदिर खांदा कॉलनी येथे मोफत आरोग्य व दंतचिकित्सा शिबिर पार पडले. कामोठे येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी माधवबाग येथे आरोग्य सहल काढण्यात आली होती. या सोहळ्याला माजी खासदार राम ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com