उल्हासनगरात यूजीएफ गारमेंट फेअरला सुरुवात

उल्हासनगरात यूजीएफ गारमेंट फेअरला सुरुवात

Published on

उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : उल्हासनगरचा पारंपरिक वस्त्रोद्योग नव्या क्षितिजांकडे वाटचाल करत असतानाच, शहरातील व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या ‘यूजीएफ २०२५’ या भव्य गारमेंट फेअरची दिमाखदार सुरुवात रविवारी (ता. १३) एंटीलिया परिसरात झाली. राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून फेअरचे उद्‍घाटन करण्यात आले. या सोहळ्याला आमदार कुमार आयलानी, भाजपचे पदाधिकारी, व्यापारी प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात वस्त्रोद्योगमंत्री सावकारे यांचा आमदार आयलानी आणि यूजीएफ २०२५ च्या आयोजक मंडळाकडून सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात सावकारे यांनी उल्हासनगरच्या उद्योजकांना सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उल्हासनगरचा कपडा व्यवसाय केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर पोहोचावा, यासाठी राज्य सरकार सदैव व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावर आमदार आयलानी यांनीही, कोणत्याही व्यापाऱ्याला वस्त्रोद्योग क्षेत्रात अडथळा आल्यास ते आणि त्यांची टीम सदैव मदतीसाठी तत्पर राहतील, असे आश्वासन दिले. या सोहळ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधर्या, उल्हासनगर शॉपकीपर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी, व्यापारी छोटू साई (वशन शाहा दरबार), यूजीएफ २०२५ चे संयोजक व आयोजक, भाजपचे विविध पदाधिकारी आणि व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वस्त्रप्रकारांचे प्रदर्शन
उल्हासनगरसह ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक अशा विविध भागांतील कपडा व्यापाऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या रेडीमेड वस्त्रप्रकारांचे प्रदर्शनामध्ये सादर केले आहे. पुरुषांचे, महिलांचे आणि मुलांचे फॅन्सी गारमेंट्स, ट्रेंडी कलेक्शन, पारंपरिक व फ्युजन पोशाखांचे अनोखे मिश्रण येथे पाहायला मिळते. हे प्रदर्शन १३ जुलै ते १५ जुलैदरम्यान ग्राहकांसाठी खुले आहे. विक्रेते आणि खरेदीदार यांच्यात थेट संवाद साधण्याची ही सुवर्णसंधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com