महानिर्मितीला आता कोळशाचे नो टेन्शन!

महानिर्मितीला आता कोळशाचे नो टेन्शन!

Published on

महानिर्मितीची कोळशाची चिंता मिटणार!
गरेपालमा खाण प्रकल्पाला सर्व परवानग्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः राज्यासाठी आवश्यक असलेल्या विजेची निर्मिती करण्यात मोठा वाटा असलेल्या महानिर्मिती या वीज कंपनीची कोळशाची चिंता आता मिटणार आहे. महानिर्मितीला कोळसा कंपन्यांकडून कोळसा खरेदी करावा लागत होता; मात्र केंद्र सरकारने २०१५ मध्ये छत्तीसगडमधी गरेपालमा दोन ही कोळसा खाण महानिर्मितीला दिली असून आता त्यामधून कोळसा काढण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे वर्षाला सुमारे २३ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा उपलब्ध होणार असल्याने महानिर्मितीला आता पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे.
महानिर्मिती ही राज्य सरकारची वीजनिर्मिती कंपनी असून त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता १३ हजार मेगावाॅटहून अधिक असून महावितरणला दररोज सुमारे नऊ-दहा हजार मेगावाॅट एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा केला जातो. महानिर्मितीच्या एकूण वीजनिर्मिती क्षमतेपैकी १० हजार २०० मेगावाॅट औष्णिक प्रकल्पांची क्षमता आहे. त्यांना स्थापित क्षमतेचा विचार करता दररोज सुमारे एक लाख १० हजार दशलक्ष मेट्रिक टन कोळशाची गरज आहे. हा कोळसा वेगवगेळ्या कोळसा कंपन्यांकडून मिळतो; मात्र पावसाळ्यात खाणीत पाणी शिरल्याने किंवा उन्हाळ्यात विजेची मागणी जास्त असताना पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने त्याचा थेट वीजनिर्मितीवर परिणाम होतो. आता महानिर्मितीच्या छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात विकसित केल्या जाणाऱ्या गरे पालमा सेक्टर दोन कोळसा खाण प्रकल्पाला केंद्राकडून सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे लवकरच येथून कोळसा उपलब्ध होऊ शकणार असल्याने राज्यातील औष्णिक वीज केंद्रांना त्याचा पुरवठा करणे शक्य होणार असल्याची माहिती महानिर्मितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
...
खाण ३० वर्षे चालणार
गरेपालमा दोन या खाणीत सुमारे ६५५.१५ दशलक्ष मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात कोळशाचा साठा आहे. वर्षाला येथून कमाल २३.६ दशलक्ष एवढा कोळसा काढला जाणार आहे. त्यामुळे पुढील ३० वर्षे ही खाण चालू शकेल, अशी माहिती महानिर्मितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
...
३,४०० जणांच्या हातांना काम
- कोळसा खाण प्रकल्पाकरिता गुंतवणूक ७४,६३ कोटी रुपये
- एकूण ३,४०० जणांच्या हातांना काम मिळणार
- छत्तीसगड राज्याला राॅयल्टीच्या माध्यमातून २९,००० कोटी रुपये मिळणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com