दौडणपाडा शाळेत अत्याधुनिक शौचालय

दौडणपाडा शाळेत अत्याधुनिक शौचालय

Published on

कासा (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील गंजाड केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवनाथ, दौडणपाडा येथे अत्याधुनिक शौचालय युनिटचे उद्‍घाटन पार पडले. पेन्स सहयोग फाउंडेशनच्या गुरुकिल्ली उपक्रमअंतर्गत हे शौचालय साकारण्यात आले असून, बर्न ॲण्ड मॅकडॉल इंजीनियरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि लिविंग टोन क्रिकेट ग्रुप यांनी या उपक्रमासाठी आर्थिक मदत केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कैवल्य सावे, योगेश सावे, दीप्ती सावे, तसेच पेन्स सहयोग फाउंडेशनचे संपूर्ण पथक उपस्थित होते. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील कोंब, पेस अध्यक्ष चंद्रकांत कोंब, मुख्याध्यापक कुंडलिक सुपेकर व सर्व शिक्षकवृंद, तसेच केंद्रप्रमुख आणि केंद्रातील इतर शिक्षक उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com