मुंबई
तुटलेल्या झाकणामुळे अपघाताचा धोका
मालाड (बातमीदार)ः मालवणी गेट क्रमांक ६ येथील गावदेवी मंदिर रस्त्यावरील गटाराचे लोखंडी झाकण तुटल्याने दुर्घटनेची भीती आहे. या प्रकाराकडे महिन्याभरापासून दुर्लक्ष होत असल्याने दुचाकी अडकून अपघात झाले आहेत. या रस्त्यावर दोन शाळा असून हजारो विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे एखाद्या चिमुकला पाय अडकून जखमी होण्याची शक्यता अधिक आहे. याबाबत रहिवासी मोहसीन अन्सारी यांनी पालिकेच्या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली आहे. मात्र, अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.