पेण येथील शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वि. देव (सेमी इंग्लिश) माध्यमिक विद्यालयातील
शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीमती सुमतीबाई देव विद्यालयाचे यश
सकाळ एनआयईचे शालेय व्यवस्थापनाकडून विशेष कौतुक
पेण, ता. १४ (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असतात; परंतु विद्यार्थ्यांनीसुद्धा प्रतिसाद देणे गरजेचे असते. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उंचावल्याचे पेण येथील शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वि. देव (सेमी इंग्लिश) माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भोर मार्गदर्शन करताना बोलले.
पेण येथील शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वि. देव (सेमी इंग्लिश) माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत फेब्रुवारी २०२५मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचा कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला आला होता. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच इतरही पुस्तके, वर्तमानपत्रे वाचली पाहिजेत. ‘सकाळ’ वृत्तपत्राने एनआयईसारखे दर्जेदार साप्ताहिक फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहे. एनआयई पेपरचा उपयोग प्रत्येक विद्यार्थ्याने केल्यास आपला शैक्षणिक व बौद्धिक दर्जा सुधारण्यास मदतच होईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सई कचरे, हिमांशू मोडक, वंश भगत, किमया धांडे, सई म्हात्रे तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेदान्त बेदरे, राजवीर पाटील, श्रेयसी सकपाळ या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव, संस्थेचे संचालक, पर्यवेक्षक सतीश पाटील, प्रशासन अधिकारी आर. आर. पाटील यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमावेळी मार्गदर्शक उज्ज्वला दळवी, रसिका पाटील, श्रद्धा म्हात्रे, प्रतीक्षा पाटील, जागृती म्हात्रे, प्रवेशा सुतार, विशाखा पाटील उपस्थित होते.
---------------------------------------------------
‘सकाळ’ एनआयई हे १२ पानी रंगीत वृत्तपत्र खरोखर विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे. गेल्यावर्षी आमच्या शाळेतील १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एनआयईचा लाभ घेतला होता. यावर्षीही विद्यार्थी, पालक स्वतःहून अंकाची मागणी करीत आहेत. अशाप्रकारे वृत्तपत्र सुरू करून ‘सकाळ’ समूहाने शैक्षणिक क्षेत्राला एनआयई ही देणगी दिली असून, विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळविण्याचे एक उत्कृष्ट काम केले आहे.
- सतीश पाटील, पर्यवेक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.