बेकायदा जाहिरात फलक लावल्याने पाच जणांवर गुन्हे

बेकायदा जाहिरात फलक लावल्याने पाच जणांवर गुन्हे

Published on

बेकायदा जाहिरात फलक लावल्याने पाच जणांवर गुन्हे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : शहरात लागलेल्या बेकायदा जाहीरातीच्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. पालिका प्रशासन या बेकायदा फलकांवर कारवाई करत असले तरी बेकायदा जाहिरातबाजी करणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. याविरोधात आता पालिका प्रशासनाने कठोर कारवाईची पावले उचलली आहेत. डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या पाच जणांविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बेकायदा जाहिरात बॅनर, फलक लावले जात आहेत. जाहिरात फलक, होर्डिंग लावणारे पालिकेची परवानगी न घेताच शहरात असे फलक लावत आहेत. शहरात बेकायदा बॅनरबाजी करणाऱ्यांवर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. या बेकायदा होर्डिंग, बॅनर, जाहिरात फलक पालिका प्रशासन कारवाई करत उतरविते; मात्र या कारवाईने कोणालाही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. बेकायदा जाहिरातींचे प्रमाण शहरात काही कमी होताना दिसत नाही. शहरातील मुख्य रस्ते, चौकात असे जाहिरातींचे फलक सर्रास दिसून येतात. याविरोधात आता पालिकेने कायदेशीर कारवाईची पावले उचलली आहेत. डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्यात बेकायदा जाहिरात करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

डोंबिवलीतील फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक जयवंत चौधरी यांच्या फिर्यादीवरून टिळकनगर पोलिसांनी हे गुन्हे दाखल करून घेतले आहेत. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार फ प्रभागात गुरुवारी सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रभागातील अनधिकृत बॅनर, पोस्टरविरोधात कारवाई करण्यासाठी गेले होते. पाथर्ली परिसरात स्वागत हॉटेल, तर टिळकनगर परिसरात के. आर. कोटकर ज्युनियर कॉलेज या नावाने जाहिरात फलक लावलेले आढळून आले. हे जाहिरात फलक लावताना महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फ प्रभागातील टिळकनगर, पाथर्ली व गोपाळनगर भागात काही जाहिरात फलक हे विनापरवानगी लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार शहर‍ विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या होर्डिंग्ज व बॅनर्सवर निष्कासनाची कारवाई नियमित स्वरूपात करण्यात येत आहे. याच अनुषंगाने प्रभागातील अनाधिकृत होर्डिंग/ बॅनर्सवर महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियमातंर्गत पाच गुन्हे दाखल केले आहेत.
- हेमा मुंबरकर, सहाय्यक आयुक्त, फ प्रभाग केडीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com