शिका फायदेशीर स्टोन क्रशर व्यवसाय
SIILC च्या लोगोसह वापरावी
शिका फायदेशीर स्टोन क्रशर व्यवसाय
सकाळ भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजन
बेलापूर, ता. १४ : स्टोन क्रशर व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणारे दोनदिवसीय प्रशिक्षण १९ व २० जुलै रोजी सकाळ भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजिले आहे. प्रशिक्षणात व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या, जमीन निवडीपासून ते मशीन सेटअप आणि मार्केटिंग, व्यवसायाचे प्रारूप, महसूल स्रोत, सरकारी एनओसी, कायदेशीर प्रक्रिया, योग्य जागेची निवड, जमीन सर्वेक्षण आणि मशीन बसवणे यांचा समावेश आहे. सहभागींना प्रकल्पाचा खर्च, खाणकाम, यंत्र देखभाल, आर्थिक व्यवस्थापन आणि विपणन धोरणांबद्दलदेखील माहिती मिळेल.
या क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक परिपूर्ण प्रशिक्षण आहे. तज्ज्ञांच्या सूचना आणि व्यावहारिक मार्गदर्शनासह, सहभागींना आत्मविश्वासाने यशस्वी क्रशर व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठीचे मार्गदर्शन व उद्योगातील तज्ज्ञांकडून शिकण्याची ही अमूल्य संधी आहे.
या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्यांना प्रत्यक्ष प्रकल्प अभ्यास, यशस्वी उद्योजकांचे अनुभव आणि स्टोन क्रशिंग क्षेत्रातील सध्याच्या ट्रेंडबाबतही माहिती दिली जाईल. बँक कर्ज मिळवण्यापासून ते सरकारी अनुदानाच्या संधींपर्यंत सर्व बाबींचा समावेश यात आहे. व्यवसायासाठी योग्य धोरण आखण्यास हे प्रशिक्षण निश्चितच उपयुक्त ठरेल.
संपर्क: ८४८४८११५४४
क्यूआर कोड: PFA
ठिकाण: ‘सकाळ भवन’, सीबीडी बेलापूर, प्लॉट क्र. ४२ बी, सेक्टर ११, नवी मुंबई.