एआयबद्दल मनातील भीती घालवा ,नोकरी व्यवसायाच्या दालने खुली होणार

एआयबद्दल मनातील भीती घालवा ,नोकरी व्यवसायाच्या दालने खुली होणार

Published on

एआयबद्दल मनातील भीती घालवा, नोकरीची दालने खुली होणार
चिन्मय गवाणकर यांचे वसईत प्रतिपादन
वसई, ता. १६ (बातमीदार) ः एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे नाव ऐकल्यावर भीती वाटते, मात्र एआयमुळे नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारत सरकारकडून प्रत्येक राज्यात एआयचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात याचा फायदा व्यापक स्वरूपाचा असेल, असे प्रतिपादन जागतिक व्यवसाय सल्लागार संस्था अन्सर्ट अँड यंगचे भागीदार तथा करिअर तज्ज्ञ चिन्मय गवाणकर यांनी वसईत केले.
बहुजन विकास आघाडी नवघर माणिकपूर युवा विभागाच्या वतीने वसई माणिकपूर समाजउन्नती सभागृहात माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह युवा विकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द सातत्याने ऐकतो. बरेचदा आपल्या कामात त्याचा वापरही करतो, पण हे तंत्र विकसित होण्यामागचा विचार काय? ते कसं तयार झालं? त्याचा वापर आज कुठल्या क्षेत्रांमध्ये आणि कशाप्रकारे होतो. त्याचे फायदे तोटे काय? या सर्व बाबीची माहिती गवाणकर यांची सविस्तरपणे युवकांना दिली. या वेळी त्यांनी सांगितले की, वैज्ञानिक, इंजिनिअर, डॉक्टर, वकील यांच्यासह आरोग्य विभागात तसेच आपल्याला आवडत्या व काम करत असलेल्या ग्राफिक डिझाइन, डिजिटल मार्केटिंगसह अनेक बी-विभागात एआय मदतीचे ठरणार आहे.
नवीन शिकायला अनेकदा भीती वाटते, मात्र केवळ दहावी, बारावी, डिग्रीपर्यंत मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती अवगत करण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे, असेही गवाणकर यांनी म्हटले आहे. या वेळी गवाणकर यांनी त्याचे निरसन केल्याने एआयविषयी विद्यार्थ्यांना अधिक आवड निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले.
या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निपुण दोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रवीण चव्हाण यांनी मानले. या वेळी सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

फोटोओळ
वसई : करिअर तज्ज्ञ चिन्मय गवाणकर मार्गदर्शन करताना उपस्थित नागरिक
वसई : शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com