विमानतळासाठी स्वतंत्र सबस्टेशन!
नवी मुंबई विमानतळासाठी स्वतंत्र उपकेंद्र!
पूर्ण क्षमतेसाठी ७५ मेगावाॅट ऊर्जेची मागणी
वसंत जाधव/ सकाळ वृत्तसेवा.
पनवेल, ता. १५ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सप्टेंबरअखेर पूर्णत्वास येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणे अपेक्षित आहे. देशातील या सर्वात मोठ्या विमानतळ जेव्हा पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हा ७५ मेगावाॅट ऊर्जेची आवश्यकता आहे. त्यासाठी महापारेषण कंपनीकडून उच्च दाबाचे स्वतंत्र उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजन सुरू आहे.
सध्या विमानतळाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उड्डाण करेल. सुमारे १३ हजार कर्मचारी येथे कार्यरत असून, उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सिडकोतर्फे एक हजार १६० हेक्टरच्या संपूर्ण जागेवर १०० टक्के प्रवेश आणि मार्गाधिकारासाठी अनुज्ञप्ती नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडला प्रदान करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १ आणि २ टप्प्यामध्ये २० दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे.
--------------------
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे. सध्या बांधकामासाठी महावितरणकडून नेरूळ विभागाअंतर्गत वीजपुरवठा केला जात आहे. त्यांना फेजनुसार विजेची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष विमानतळ कार्यान्वित होईल तेव्हा २५ मेगावाॅटची ऊर्जा लागणार आहे. तितकी क्षमता आमच्याकडे उपलब्ध आहे, परंतु भविष्यातील गरज पाहता येथे महापारेषणकडून या ठिकाणी उच्च दाबाचे उपकेंद्र उभारले जाणार आहे.
ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.