नोकरीच्या नावे कोट्यवधींचा गैरव्यवहार

नोकरीच्या नावे कोट्यवधींचा गैरव्यवहार

Published on

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : सायबर गुन्हेगारांना बँक खाती पुरवणाऱ्या टोळीने नोकरीचे प्रलोभन दाखवून २४ वर्षीय तरुणाच्या नावाने विविध बँकांमध्ये खाती उघडून, कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वसीम मोहम्मद नसीम अन्सारी (२४) हा मानखुर्द येथे राहतो. ८ मार्च २०२४ रोजी वसीम वाशी रेल्वेस्थानकाजवळ चहा पीत असताना त्याची ओळख मनीष शर्मा आणि विजय शर्मा या दोघांशी झाली. दोघांनी वसीमला कमी वेळ आणि चांगल्या पगाराच्या नोकरीचे प्रलोभन दाखवले. त्यानंतर काही दिवसांनी दोन्ही आरोपींनी वसीमच्या नावाने येस बँक, एचडीएफसी बँक, आरबीएल आणि ॲक्सिस बँक या चार बँकांमध्ये खाते उघडले. ही सर्व बँक खाती उघडताना वसीमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करण्यात आला.
तीन महिन्यांनंतर एचडीएफसी बँकेने वसीमला संपर्क साधून त्याच्या खात्यात तब्बल एक कोटी रुपये जमा झाल्याचे सांगून त्याच्या प्रत्येक व्यवहाराची माहिती देण्यास सांगितले. वसीमने मोबाईलमधील संदेश तपासले असता, त्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याची तसेच ते परस्पर काढून घेण्यात आल्याचे समजले. त्यानंतर त्याच्या नावाने उघडण्यात आलेल्या बँक खात्यातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे वसीमला समजले. याप्रकरणी त्याने वाशी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना बँक खाती पुरवणाऱ्या टोळीतील मनीष शर्मा आणि विजय शर्मा या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सायबर गुन्हेगारांची टोळी सक्रिय
सायबर गुन्हेगारांना बँक खाती पुरविणारी टोळी सध्या सक्रिय झाली आहे. या टोळ्या बेरोजगारांना हेरून त्यांना थोडीफार आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतात. त्यानंतर ही बँक खाते सायबर गुन्हेगारांना देण्यात आल्यानंतर ते फसवणुकीसाठी करत असल्याचे आढळत असून, पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com