भिवंडीत सरपंचपदाची सोडत
भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : सरकारने सरपंचपदासाठी यापूर्वी काढलेली आरक्षण सोडत रद्द केल्याने नव्याने अध्यादेश काढण्यात आले होते. त्यात आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले. भिवंडी तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील ४० ग्रामपंचायती वगळता उर्वरित ८१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी (ता. १५) कामतघर येथील वऱ्हाळ माता मंगल कार्यालयात काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण जाहीर करण्यात आले.
तालुक्यातील ४० ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असल्याने उर्वरित ८१ ग्रामपंचायतींपैकी सहा अनुसूचित जाती, आठ अनुसूचित जमाती, २२ नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर उर्वरित ४५ सर्वसाधारण यांच्यासाठी राखीव आहेत. यामध्ये ४० सरपंचपद ही महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित क्षेत्रातील ४०पैकी २० सरपंच पदे हीसुद्धा महिलांसाठी राखीव असणार आहेत. सरपंच आरक्षण सोडत पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर, अव्वल कारकून किरण केदार, शैलेश भोजने, गणेश पाटील, निवडणूक विभागाचे आनंद पवार यांनी विशेष मेहनत घेतली. सोडतप्रसंगी उत्सुकता ताणलेले अनेक गावांतील इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती.
प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत
अनुसूचित जाती महिला - वडघर, वडपे, कवाड
अनुसूचित जाती सर्वसाधारण - भोकरी, पडघा, कोन,
अनुसूचित जमाती महिला - कुकसे, सावंदे, आलीमघर, कुरुंद
अनुसूचित जमाती सर्वसाधारण - लामज, किरवली तर्फे खंबाळे, नांदकर सांगे, सापे
इतर मागासवर्गीय महिला - गोरसई, सरवली, कालवार, ओवळी, भादाणे, राहूर, कांदळी, वळ, कारिवली, अंजूर, कशेळी
इतर मागासवर्गीय सर्वसाधारण - महापोली, लाप, खांडपे तर्फे चिंचवली, निंबवली, पिंपळास, काल्हेर, खंबाळे, जुनांदुर्खी, बापगाव, डोहाळे, दापोडे
सर्वसाधारण महिला - शेलार, राहनाळ, भिनार, कोशिंबे, चावे, तलवली अर्जुनली, पुंडास, पिसे, मोरणी, आवळे, कुसापूर, कोपर, कासणे, खानिवली, दिवे केवणी, आमणे, अनगाव, गोवे, वडुनवघर, पिंपळघर राजनोली, खोणी, खालिंग बुद्रुक,
सर्वसाधारण - खारबाव, निवळी, पूर्णा, केवणी, सवाद, काटई, पिंपळनेर, सोनाळे, धामणगाव, वांद्रे, पायगाव, माणकोली, मालोडी, खांडवळ, डुंगे, सुरई सारंग, दिवे अंजूर, गुंदवली, वेहेळे, लोनाड, वडवली, भरोडी, बोरिवली तर्फे राहुर,
अनुसूचित क्षेत्रातील १३ मे रोजीचे आरक्षण
अनुसूचित जमाती महिला - ब्राह्मणगाव, गणेशपुरी, वज्रेश्वरी, महाळुंगे, अस्नोली, मालबिडी सूर्यानगर, सुपेगाव, पालखणे, एकसाल, दुधनी, झिडके, पहारे, चाणे, कुंदे, दिघाशी, पच्छापूर, मोहंडुळ, चिंबीपाडा, कुहे, पारीवली
अनुसूचित जमाती सर्वसाधारण - अकलोली, घोटगाव, दुगाड, मोहिली, नांदीठणे, पिळंझे, मैंदे, वेढे, वारेट, खरिवली शेडगाव, चिंचवली तर्फे कुंदे, अंबाडी, दाभाड, केल्हे, शिरोळे, पाये, खडकी, गाणे फिरिंगपाडा, लाखिवली, कांबे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.