पावसामुळे सखल भागात घाण, चिखल

पावसामुळे सखल भागात घाण, चिखल

Published on

भिवंडी, ता. १६ (बातमीदार) : मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचत आहे. हे पाणी काही वेळाने प्रवाहित झाल्यानंतर त्यासोबत आलेली घाण आणि चिखल परिसरात तसाच राहतो. अशा वेळी नागरिकांना संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी स्वच्छतेची व्यवस्था करण्यात यावी. तसेच, संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी महापालिका प्रशासक अनमोल सागर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

मुसळधार पावसामुळे भिवंडीतील अनेक ठिकाणी लोकवस्ती आणि रहदारीच्या मार्गावर पाणी साचले होते. संगम पाडा, म्हाडा कॉलनी, कोंबडपाडा, अजय नगर, शिवाजी चौक, आदर्श पार्क, नजराणा कम्पा‍उंड, घुंगटनगर, शिवाजीनगर, तीन बत्ती भाजी मार्केट, भावे कम्पा‍उंड, पद्मानगर, दर्गा रोड, आझमीनगर, काकूबाई चाळ, नवी बस्ती, गोपाळनगर, अशोक नगर, मानसरोवर, कामतघर, भंडारी कम्पा‍उंड, ओसवाल वाडी, फेणा पाडा, आशीर्वाद नगर आणि झोपडपट्टी भागात पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यावेळी नाले आणि गटारांमधून कचरा रस्त्याच्या कडेला असलेल्या निवासी भागात जमा झाला. शहरात पसरलेल्या या घाण कचऱ्यामुळे डासांची पैदास झाली आहे. त्यामुळे शहरात डेंगी, मलेरिया, ताप इत्यादी पावसाळी आजारांचा गंभीर धोका निर्माण आहे. या संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने शहरातील लोकवस्तीच्या भागात कीटकनाशकांची फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पथकाने प्रत्येक निवासी भागात योग्य स्वच्छता करून कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शहरातील नागरिकांसाठी वैद्यकीय उपचार सुविधांचीही सोय करावी, अशी मागणी जनहित सामाजिक संस्थेने प्रशासक सागर यांच्याकडे केली आहे.

साफसफाईवर विशेष लक्ष
महापालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधला असता स्वच्छता आरोग्य अधिकारी जे. एम. सोनवणे यांनी सांगितले की, प्रशासकांच्या सूचनेनुसार महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना निवासी भागात कीटकनाशकांची फवारणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साफसफाईच्या कामावर विशेष लक्ष दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com