दिव्यांग धावपट्टूची आफ्रिकेत चर्चा

दिव्यांग धावपट्टूची आफ्रिकेत चर्चा

Published on

प्रभादेवी, ता. १५ (बातमीदार): दक्षिण आफ्रिकेतील द अल्टिमेट ह्यूमन रेस कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सुरेश वेलणकर यांनी शारीरिक व्यंगावर मात करत यश संपादन केले आहे. ही स्पर्धा पूर्ण करताना त्यांनी भारताचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेत १८ देशांतून २४ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. पीटरमॅरिट्झबर्ग आणि डर्बन दरम्यान सुमारे ९० किलोमीटरच्या अथक टेकड्यांसह कॉम्रेड मॅरेथॉन जगातील सर्वात कठीण शर्यतींपैकी एक मानली जाते. भारतातून ५० ते ५९ वयोगटातील शर्यतीत सुरेश वेलणकर यांनी ९० किमीचा टप्पा नऊ तास ४१ मिनिटांत पूर्ण केला होता. माझगाव डॉक शिपयार्ड्समध्ये नोकरी करणारे सुरेश वेलणकर यांनी स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली होती. त्यात आठवड्याला १०० किलोमीटर धावणे आणि दोन दिवस व्यायामाचा सराव केला होता. त्यांच्या यशात प्रशिक्षक दीपक बुधराणी तसेच आशीष बोधनकर यांचे प्रशिक्षण खूप मोलाचे ठरले.
---------------------------------------------------------
रत्नागिरीचा राजदूत
घरी खेळताना शिडीवरून पडलेल्या सुरेश यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गॅंगरीनमुळे डावा हात गमावला होता. ठाण्यात राहणाऱ्या सुरेशने २०२२ मध्ये वयाच्या ५७ व्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. आजपर्यंत २१ हाफ मॅरेथॉन, नऊ पूर्ण मॅरेथॉन, तीन अल्ट्रामॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत, तर रत्नागिरीत सलग दोन वेळा पहिल्या क्रमांकाचे विजेतेपद पटकावले असून, रत्नागिरीचा राजदूत असा बहुमानही मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com