पालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार

पालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार

Published on

विरार, ता. १५ (बातमीदार) : केंद्र आणि राज्यातील सरकारवर हल्लाबोल करतानाच पालघर जिल्हा आणि खासकरून वसई-विरार शहर हे भांडवलदारांना देण्याच्या उद्देशाने भाजप सरसावत आहे, कारण येथून जाणारी बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, तसेच पालघर येथे नव्याने होणारे विमानतळ यावर उद्योजकांसह भाजपचाही डोळा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये मतदान करताना जनतेने सर्वतोपरी विचार करूनच मतदान करावे. आगामी पालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे कोकण विभाग प्रभारी आमदार यु. बी. वेंकटेश यांनी केले. तसेच संघटनात्मक बांधणीबरोबरच आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग काँग्रेसने फुंकले आहे.

वेंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत वसई-विरार जिल्हा काँग्रेसतर्फे दोन कार्यकर्ता मिळावे घेण्यात आले. नालासोपारा, बोईसर विधानसभेचा एकत्रित मेळावा हॉटेल रेड कार्पेट येथे, तर वसई विधानसभेसाठी वसई पारनाका काँग्रेस हाउस येथे आयोजित करण्यात आला होता. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी आणि काँग्रेस संघटनेची बांधणी समाधानकारक होती, पण काही टक्के मतांनी विजयापासून इंचभर दूर राहिलेली काँग्रेस महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने उतरणार आहे. पक्षाचे प्रदेश प्रभारी आ. यु. बी. वेंकटेश यांनी आपल्या मार्गदर्शनापर भाषणात खासकरून बूथ कमिटी, तसेच स्थानिक मुद्द्यांवर आंदोलनाबाबत कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

बिहारमध्ये निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अचानक वाढलेली ७१ लाख मते हे फार मोठे षडयंत्र असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रभाग रचनेप्रमाणेच मतदार यादीत कमी होणारी व वाढणारी नावे यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून योग्य वेळी आवाज उठवावा, असे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी सांगितले. या वेळी नीलेश पेंढारी, विकासबंधू वर्तक, जोजो थॉमस, प्रदेश काँग्रेस सचिव आनंद सिंग, दिनेश कांबळे, किरण शिंदे, नितीन उबाळे, वेल्फ्रेड डिसोजा, बिना फुर्त्याडो, संदीप कनोजिया, प्रविणा चौधरी, डॉमिनिक डिमेलो, लक्ष्मी नायर, सलीम खिमानी, रामदास वाघमारे, जतिन लिंबाचीया, निखिलेश उपाध्याय, प्रकाश पाटील, अर्शद डबरे प्रामुख्याने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com