वातानुकूलीत प्रवास भोवला

वातानुकूलीत प्रवास भोवला

Published on

वातानुकूलित प्रवास भोवला
विनातिकीट प्रवाशांकडून चार कोटींचा दंड वसूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलमधील प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि नियमबद्ध करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच अनुषंगाने स्थापन केलेल्या ‘एसी लोकल टास्क फोर्स’ने वर्षभरात १.२२ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करीत चार कोटींचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.
विनातिकीट प्रवाशांमुळे वातानुकूलित लोकलचा प्रीमियम सेवेचा दर्जा घसरू नये, यासाठी मध्य रेल्वेने घेतलेले धाडसी पाऊल यशस्वी ठरले आहे. एसी लोकलमधील बेकायदा प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वेने गेल्या वर्षी विशेष टास्क फोर्स तयार केला होता. या नव्या प्रणालीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, तक्रारींची संख्या लक्षणीयरीत्या घसरली आहे.
----------------------------------------------
१.२२ लाख बेकायदा प्रवाशांवर कारवाई
जून २०२४ मध्ये दररोज सरासरी ७९ तक्रारी मिळत होत्या. त्या यंदा जून २०२५मध्ये फक्त २९ वर आल्या आहेत. दरम्यान, २४ मे २०२४ पासून आतापर्यंत ११,१३४ तक्रारींची नोंद झाली असून, प्रत्येक तक्रारीवर फक्त दोन दिवसांत कारवाई करण्यात आली आहे. या काळात १.२२ लाख बेकायदा प्रवाशांवर कारवाई करीत ४.१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
-------------------------------
ग्राफिक्स -
टास्क फोर्सची जबाबदारी
- तक्रारींसाठी खास व्हॉट्सॲप क्रमांक - ७२०८८१९९८७
- तक्रारी मिळताच टास्क फोर्सकडून तत्काळ कारवाई
- पथक अनुपलब्ध असेल, तर दुसऱ्या दिवशी कारवाई
़़़़़़़़़़़़़़़़़़़
कारवाईचा आकडा
२५ मे २०२४ ते ९ जुलै २०२५ या कालावधीत
- १.२२ लाख अनधिकृत प्रवासी पकडले
- ४.०१ कोटी रुपयांचा दंड वसूल
--------------
दररोज सरासरी
- ३६५ प्रवासी विनातिकीट प्रवास
- १.१९ लाख रुपये दंड
-------------
तक्रारीत घट -
जून २०२४ : दररोज ७९ तक्रारी
जून २०२५ : दररोज २९ तक्रारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com