निर्माते व दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन

निर्माते व दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन

Published on

निर्माते, दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक धीरज कुमार (वय ८०) यांचे आज सकाळी अंधेरीतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी (ता. १६) त्यांच्या अंधेरीतील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत दुपारी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धीरज कुमार यांनी १९६५मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सुभाष घई आणि राजेश खन्ना यांच्यासोबत एका टॅलेंट शोमध्ये त्यांनी भाग घेतला होता. अंतिम स्पर्धकांमध्ये ते पोहोचले होते. त्यामध्ये राजेश खन्ना हे विजेते ठरले. धीरज कुमार यांनी ‘रातो का राज’, ‘बहारो फुल बरसाओ’, ‘रोटी कपडा और मकान’सारख्या हिंदी चित्रपटांत काम केले. त्यांनी १९७० ते १९८४ या काळात २१ पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. ‘स्वामी’ चित्रपटातील ‘का करू सजनी’, ‘आये ना बलम’ ही गाणी त्यांच्यावर चित्रित करण्यात आली होती. ‘हीरा पन्ना’ आणि ‘रातों का राजा’ या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. त्यांनी क्रिएटिव्ह आय नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली. त्या माध्यमातून त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली. ‘ओम नमः शिवाय’, ‘श्री गणेश’, ‘घर की लक्ष्मी बेटिया’, ‘मन में हैं विश्वास’, ‘जय माँ वैष्णो देवी’, ‘तुझ संग प्रीत लगाई’, ‘यारो का टशन’, ‘इश्क सुभान अल्लाह’, अशा काही मालिका त्यांनी बनविल्या. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी त्यांना कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com