कल्याण अवती भवती

कल्याण अवती भवती

Published on

वारसाहक्काने ११४ वारसदारांना नियुक्तिपत्र प्रदान
कल्याण (वार्ताहर) : लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काच्या अंमलबजावणीबाबत महापालिकेच्या सफाई कामगार या पदावरील सेवानिवृत्त, स्वेच्छासेवानिवृत्त, मृत, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना वारसाहक्काने नियुक्ती देण्याबाबत पात्र ठरवले आहे. वैद्यकीयदृष्ट्या पात्र व चारित्र्य आणि पूर्वचारित्र्य पडताळणीअंती पात्र ठरलेल्या एकूण ११४ वारसदारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यामध्ये एक भूमापक, २४ लिपिक, ३४ शिपाई, ५५ सफाई कामगार या पदांवर एकूण ११४ वारसदारांना नियुक्तीचे आदेश वितरित केले.
..................
शिवाजी महाराजांच्या शिल्पफलकाचे अनावरण
टिटवाळा (वार्ताहर) : तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनस्थ शिल्प फलकाचे अनावरण दिमाखात पार पडले. भाजपचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या हस्ते हे शिल्प फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी गावातील महिला मंडळ समाजहॉल दुरुस्ती कामाचे उद्घाटनही करण्यात आले. उद्योजक दिनेश कथोरे, भाजप उपाध्यक्ष राजाराम चौधरी व संचालक योगेश धुमाळ यांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून उद्घाटन सोहळा पार पडला. मूर्तिकार पप्पी गोंडाबे यांच्या सर्जनशील कल्पनेतून साकारलेली सिंहासनस्थ शिवशिल्प प्रतिमा हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. या वेळी गायकवाड हिने महाराजांचे शौर्यकथन आपल्या प्रभावी वक्तृत्वातून सादर केले. जिल्हाध्यक्ष डाकी यांनी शिवचरित्राचा गौरवशाली इतिहास सांगत युवकांना प्रेरणा दिली. उद्योजक दिनेश कथोरे यांनी घोटसई ग्रामपंचायतीच्या विकासाभिमुख कामांचे कौतुक करीत इतर ग्रामपंचायतींनीदेखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. या वेळी कल्याण ग्रामीणचे प्रमुख शेखर लोणे, सरपंच राजेंद्र मगर, उपसरपंच रोशनी धुमाळ, तसेच अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...................
श्वान निर्बीजीकरण केंद्राची सुरक्षा भिंत कोसळली
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्राची सुरक्षा भिंत मंगळवारी (ता. १५) सकाळी कोसळल्याची घटना घडली. कल्याण पश्चिमेतील सर्वोदय मुख्य नाल्यालगत पालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. या केंद्रात भटक्या व मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. उपचाराअंती देखभाल करीत चार दिवसांच्या कालावधीनंतर मुक्त केले जाते. या केंद्राची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. मुख्य नाल्यालगत हे केंद्र असल्याने या सुरक्षा भिंतीचे कामदेखील त्या दर्जाचे होणे गरजेचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com