आरक्षण सोडतीनंतर मोर्चेबांधणी सुरू

आरक्षण सोडतीनंतर मोर्चेबांधणी सुरू

Published on

आरक्षण सोडतीनंतर मोर्चेबांधणी सुरू
पावसाळ्यानंतर निवडणुकांचे बिगुल वाजणार; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत

अलिबाग, ता. १६ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल पावसाळ्यानंतर वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला असून, त्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावर येणाऱ्या हरकती विचारात घेऊन ही प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषदेचे ५९ गट असून, ११८ गण आहेत. पनवेल महापालिका झाल्यामुळे पूर्वी ६२ असलेली गटसंख्या ५९ झाली आहे. जिल्‍ह्यात एकूण ८१० ग्रामपंचायती असून, २४० निवडणुकांमध्ये रणधुमाळी उडणार आहे.
ग्रामविकास विभागाने १२ जून २०२५च्या आदेशानुसार रायगड जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या १५ पंचायत समित्यांची प्रभाग रचना २०११च्या जनगणनेनुसार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील एकूण लोकसंख्या १७ लाख ९७ हजार ४०१ इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ७३,०५९ इतकी असून, अनुसूचित जमातीची २,७४,९७४ इतकी आहे. त्यानुसार गट आणि गण पडले आहेत.

तालुकानिहाय आढावा
तालुका-लोकसंख्या-गट-गण
अलिबाग-२,१५,४२४ - ७ - १४
मुरूड -६१,९९१ - २ - ४
पेण-१,५७,६०२ -५-१०
पनवेल -२,४०,३३५-८-१६
उरण - १,३१,६८३-४ - ८
कर्जत - १,७७,९९५ - ६ - १२
खालापूर - १,२९,९०२ - ४ - ८
रोहा - १,४६,२६१ - ४ - ८
सुधागड -५१,८३१-२ -४
माणगाव -१,४०,८७३ - ४ - ८
तळा - ३३,६३८ - २ - ४
महाड - १,५२,६५५ - ५ - १०
पोलादपूर - ३९,५२० - २ - ४
श्रीवर्धन - ६७,९०४ - २-४
म्हसळा - ४६,७८७ - २ -४

जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर, सर्व तहसीलदार व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या संदर्भात कोणालाही हरकत अथवा सूचना असल्यास, लेखी स्वरूपात, कारणांसह संबंधित तहसीलदार यांच्याकडे २१ जुलैपर्यंत सादर कराव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com