मुंबई
नंदाखाल येथे कर्करोग चिकित्सा शिबिर
विरार (बातमीदार) : निभॅय जनसंस्था व निभॅय महिला मंच, सेंट विन्सेंट दी पाॅल होली स्पिरीट चर्च, नंदाखाल कॅन्सर पेशंट्स ॲण्ड असोसिएशनतर्फे रविवारी (ता. २०) नंदाखाल येथील सेंट झेवियर्स कॉन्व्हेंटमध्ये सकाळी १० वाजता कर्करोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांसाठी गर्भाशय, पॅपस्मिअर, स्तन तपासणी, महिला स्त्रीरोग तज्ज्ञांद्वारे, तर पुरुषांसाठी प्रोस्टेट, संपूर्ण शारीरिक तपासणी सर्जनद्वारे करण्यात येणार आहे. तसेच स्त्री व पुरुषांसाठी सी.बी.सी. रक्त तपासणी, ल्युकेमिया रक्त तपासणी, नाक, कान, घसा तपासणी केली जाणार आहे.