बदलापुरात नाल्यात अतिक्रमण!

बदलापुरात नाल्यात अतिक्रमण!

Published on

बदलापुरात नाल्यात अतिक्रमण!
बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : मातीचा भराव टाकून नाल्याची जागा हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बदलापूर पूर्वेकडील वेंकीज हॉटेलसमोरीलनाल्यात मातीचा भराव टाकून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अंबरनाथ - बदलापूर मुख्य रस्त्यावर कात्रप येथील वेंकीज हॉटेलच्या समोरील नाल्यात दिवसाढवळ्या जेसीबीच्या माध्यमातून मातीचा भराव या नाल्यात टाकला जात होता. यावेळी नाले बचाव समिती बदलापूर व मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन हे काम थांबवून या संदर्भात बदलापूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना तक्रार देखील केली. तक्रार देताच बदलापूर पालिकेचे अधिकारी पाहणी करून त्याचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे सांगितले; मात्र अशा प्रकारे अगदी दिवसाढवळ्या नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलून त्यात मातीचा भराव टाकून ती जागा बळकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई होणं गरजेचं असल्याची भूमिका नाले बचाव समितीने मांडली. या नाल्यात या आधीच मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला गेल्याचे नाले बचाव समितीचे नाना देशमुख यांनी सांगितले. दरम्यान याचे गंभीर परिणाम म्हणजे या नाल्याचे पाणी बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गावर येऊन पावसाळ्यात हा महामार्ग बंद होऊ शकतो.

उल्हास नदीत टाकण्यात आलेल्या अनधिकृत भरावाबाबत प्रकरण ताजे असताना, कायद्याची भीती नसल्याने पुन्हा हा प्रकार नाल्यात होत असल्याचे बोलले जात आहे. मनसे व नाले बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणून पालिका प्रशासनाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले. या संदर्भात पालिकेच्या कनिष्ठ नगर अभियंता सुमित ओंबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधित कराळे नामक व्यक्तीकडून त्या ठिकाणी तयार झालेल्या खड्ड्यात मातीचा भराव टाकण्यात येत होता. या कामावेळी जलवाहिन्या तुटल्या असून त्या जोडून देण्यात आल्या आहेत. या व्यक्तिरिक्त कारवाईबाबत काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तर वरिष्ठांनी काम बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर पालिकेने ते काम बंद पाडले. अशी माहिती कनिष्ठ नगर अभियंता सुमित ओंबळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com