मातोश्री, द्वारका विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
मातोश्री, द्वारका विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
कल्याण, ता. १७ : पूर्वेतील मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय व द्वारका विद्यामंदिर विद्यालयाचे सर्वाधिक विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्तीधारक ठरतात. यंदादेखील इयत्ता पाचवीचे पाच विद्यार्थी व इयत्ता आठवीचे ११ विद्यार्थी असे एकूण १६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. आठवीच्या स्कॉलरशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गीतांजली चव्हाण २५४ गुण, पायल उदुगडे २२४, प्रीती जाधव २२२, स्वरा भालेराव २०६, इकरा पाटील २०२, कार्तिक जाधव २०२, आर्या गावडे १८८, समृद्धी डोके १८४, यश शिंदे १८०, स्नेहा धोंडफोडे १८०, दिशांत सोरते १७४ तसेच पाचवी स्कॉलरशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थांमध्ये स्वराज पाटील २१६ गुण, श्रीराज घाडगे २०६, शुभ्रा केसरकर १८२, हर्ष जाधव १८०, आरव कारंडे १८० इतके गुण मिळवून गुणवत्ता प्राप्त केली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होताच संस्थापक दत्तात्रय दळवी, संचालिका मिरा दळवी, मुख्याध्यापक चंद्रकांत तेली, गौरी देवधर, सिमा दळवी तसेच शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष संतोषी खामकर यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले, तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शक शिक्षकांमध्ये सिमा दळवी, विजया ब्राह्मणे, स्नेहा डगळे, नंदा थेटे, वैशाली चौधरी, विशाल राजाणे, अप्पासाहेब जाधव, वाघ, चांगण, पाटील, खांडगे, धस, भामरे, कुमा , कोले यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.