स्वतःचे जीव धोक्यात घालून संकट संमयी धावणाऱ्या तरुणांचा होतंय रोहेकरांकडून कौतुक
संकटसंमयी धावणाऱ्या तरुणांचे होतेय कौतुक
पुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांना नियोजित स्थळी सुखरूप नेण्याचे काम
रोहा, ता. १६ (बातमीदार) ः तालुक्यात मंगळवारी (ता. १५) ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदीला पूर आल्यानंतर पुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांना नियोजित स्थळी सुखरूप नेण्याचे काम रोह्यातील निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्था रायगड या संस्थेने केले आहे. या संस्थेतील तरुण-तरुणींचे आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
रोह्यात दोन दिवस पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. तालुक्यात सोमवारी (ता. १४) मध्यरात्रीपासून पावसाने थैमान घातले होते. यामुळे मंगळवारी कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. अशा परिस्थितीत रोहा-नागोठणे रस्ता पाण्याखाली गेला होता. दळणवळणाची सर्व साधने ठप्प झाली होती. या वेळी या संस्थेच्या तरुणांनी बोटिंगसेवा सुरू करून पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी सोडण्याचे काम केले.
संस्थेतील प्रथमेश कोळी, दत्ताराम वाघमारे, तेजस बोथरे, विघ्नेश वाघमारे, वसंत डोळकर, अमय कराळे, लवेश वाघमारे, दीपक कोल्हटकर, करण कराले, ओमकार हजारे, हर्षद भोकटे, कुणाल माळुंजकर, सनी जाधव, ऋग्वेद भोकटे, आशिष धुमाळ, प्राची सिन्हा, दिक्षा पावले, जागृती सुर्वे, ऋतिक शिंदे, हेमांगी वाघमारे, पायल लाड, संकेत हजारे या टीमच्या सदस्यांनी काम केले. माजी आमदार अनिकेत तटकरे, पोलिस प्रशासन, नगर पालिका प्रशासन यांच्या सहकार्याने या टीमला यश आले.
भिसे खिंडीत कोसळली दरड
भिसे खिंडीत दरडसहित चार ते पाच ठिकाणी वृक्ष कोसळल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील सर्व अडथळे दूर करत वाहतूक खुली केली. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
फोटो कॅप्शन :
रोहा ः पुरात अडकलेल्या वृद्ध व्यक्तीला सुखरूप पाण्यातून सुरक्षितस्थळी नेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.