
शहापूर, ता. १६ (वार्ताहर) : तालुक्यातील २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी (ता. १५) निश्चित करण्यात आले. शहापूर तालुक्यात १०८ ग्रामपंचायती असून, अनुसूचित जमाती क्षेत्र अर्थात पेसाअंतर्गत येणारा शहापूर तालुका आदिवासी जमातीसाठी राखीव आहे. त्यानुसार ५० टक्के राखीव कोट्यानुसार ५४ ग्रामपंचायतींवर महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.
आरक्षणामुळे सरपंचपदाची इच्छा बाळगून असलेल्या अनेकांचे भवितव्य येत्या कालावधीत ठरणार आहे. यामुळे गावागावांत राजकीय हालचाली सुरू होणार आहेत. शहापूर पंचायत समितीमधील शेतकी भवनात तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी पेसाअंतर्गत येणाऱ्या सर्व १०८ ग्रामपंचायतींवरील सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. महिलांसाठी राखीव ५० टक्के कोट्यानुसार ५४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. २०२० ते २०२५ या कालावधीत अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित असलेल्या ५४ ग्रामपंचायती आता यापुढे अनुसूचित जमातीच्या महिला व पुरुषांसाठी राखीव असणार आहेत.
आवाळे, आवरे, अस्नोली, अजनुप, आटगाव, अल्याणी, बोरशेती, भातसई, बाभळे, चेरपोली, चिखलगांव, चोंढे, दहीगांव, ढाढरे, दळखण, दहीवली, ढाकणे, डोळखांब, फुगाळे, गेगांव, गोठेघर, जांभुळवाड, हिव, खुटघर, कोठारे, खातिवली, किन्हवली, कानवे, लेनाड (खु.), मुगांव, मळेगांव, मोखावणे, माळ, नडगांव (सो.), रानविहीर, शेंद्रुण, शेणवे, सारंगपूरी, साठगांव, सरलांबे, शेलवली (बां.), शिळ, सावरोली (सो.), साकुर्ली, शेरे, टेंभरे, ठुणे, टेंभे, टहारपुर, उंबरखांड, वासिद, वालशेत, वांद्रे व वेहळोली (बु.) या ५४ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमातीच्या महिलांचे आरक्षण असल्याचे तहसीलदार कासुळे यांनी जाहीर केले. यावर कोणाची हरकत असल्यास नोंदवावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या वेळी शहापूरच्या महसूल उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.