पंचायत समितीच्या कारभारात अनास्था
पंचायत समितीच्या कारभारात अनास्था
उरणमध्ये वरिष्ठांचा कारभार केंद्रप्रमुखांच्या खांद्यावर
उरण, ता. १६ (वार्ताहर) ः उरण तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सध्या अनास्थेचा कारभार सुरू आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा कारभार एक महिला केंद्रप्रमुख सांभाळीत आहे. शिक्षण विभागासाठी वरिष्ठ पद भरती करणे गरजेचे असूनही या अनास्थेच्या कारभाराचा फटका तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेला बसत असल्याचे दिसून येत आहे.
उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गटशिक्षण अधिकारी, वरिष्ठ विस्तार अधिकारी, कनिष्ठ विस्तार अधिकारी ही पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. परिणामतः त्यांचा कारभार प्रभारी एक केंद्रप्रमुख महिला सांभाळीत आहे. त्यामुळे त्यांना तालुका स्तरावर शिक्षणविषयक ठोस निर्णय घेण्यात अडचण येत आहे, शिवाय शिक्षण खात्यातील अनेक निर्णयास दिरंगाई होत असल्याने उरण तालुक्यातील शिक्षण विभागाचा बोजवारा उडाला आहे. उरण तालुक्यातील पंचायत समितीमधील शिक्षण विभागामध्ये गेली अनेक वर्षे गट शिक्षण अधिकारी हे पद वरिष्ठ विस्तार अधिकारी सांभाळीत होते. या पदावर असणाऱ्या प्रियंका पाटील यांची बदली झाल्याने गट शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार जसखार केंद्र शाळेच्या केंद्रप्रमुख निर्मला घरत यांच्या हाती दिला आहे. उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गेली अनेक वर्षे गट शिक्षण अधिकारी, वरिष्ठ विस्तार अधिकारी, कनिष्ठ विस्तार अधिकारी पदे सद्यःस्थितीत रिक्त आहेत. ती पदे भरण्याची कोणतीही तसदी घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला शैक्षणिक प्रगतीबद्दल कोणतीही आस्था राहिली नसल्याचे बोलले जात आहे. ही पदे रिक्त असल्याने शिक्षणविषयक धोरणासाठी जबाबदार अधिकारी नसल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांना ठोस निर्णय घेता येत नाहीत. तसेच या ठिकाणी जबाबदार अधिकारी नसल्याने शिक्षण खात्याच्या समस्याबद्दल कोणाला विचारावे, असा सवाल केला जात आहे.
...................
उरण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५६, नगरपालिकेच्या तीन आणि २० खासगी अनुदानित अशा एकूण ७९ शाळा आहेत, तर यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून, असा संपूर्ण कारभार हा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून चालविला जातो. एवढा मोठा शिक्षण विभागाचा कारभार सांभाळताना गट शिक्षण अधिकाऱ्यांची पदे तसेच वरिष्ठ विस्तार अधिकारी, कानिष्ठ विस्तार अधिकारी अशी वरिष्ठ पदे रिक्त असणे ही मोठी खेदाची बाब आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील हा अनास्थेचा कारभार संपविण्यासाठी शासन स्तरावर तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या पदांवर पदसिद्ध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून मरगळ दूर करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
..................
ही रिक्त असणारी पदे स्थानिक पातळीवरून भरली जात नाहीत; तर ही पदे भरण्याचा अधिकार हा शासनाचा आहे.
-नेहा भोसले, मुख्य अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.