नवी मुंबई एअरपोर्टला प्रक्रीयकृत पाणी देणार

नवी मुंबई एअरपोर्टला प्रक्रीयकृत पाणी देणार

Published on

नवी मुंबई एअरपोर्टला प्रक्रियाकृत पाणी?
महापालिकेचा सिडकोकडे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ ः नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला इतर वापराकरिता प्रक्रियाकृत पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेने ठेवला आहे. सिडको महामंडळाकडे महापालिकेने पाच एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर बांधकामांव्यतिरिक्त उर्वरित कामांना हे पाणी वापरता येणार आहे.
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२५पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिली आहे. नवी मुंबईचे विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे. या विमानतळावर जागतिक पातळीवरील सेवासुविधा प्रदान करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. सध्या विमानतळाचे ९४ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीबाहेरील काम आणि अंतर्गत सजावटीचे काम होणार आहे. परंतु, विमानतळाच्या चारही बाजूंनी विविध उद्याने, हरित पट्टे असणार आहेत. याकरिता विमानतळाला रोज १० ते १५ एमएलडीपेक्षा अधिकचे पाणी लागणार आहे. नवी मुंबई विमानतळ आणि नैना प्रकल्पाकरिता सिडकोने १,२७५ एमएलडी इतक्या मोठ्या प्रमाणाची तरतूद केली आहे. २०५०मध्ये प्रत्यक्ष हे पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रक्रियाकृत पाण्याचा पर्याय पुढे केला आहे. सीबीडी-बेलापूर येथे महापालिकेने ४० एमएलडी क्षमतेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभा केला आहे. हा प्लांट विमानतळापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या केंद्राहून विमानतळाला इतर कामांकरिता हे पाणी पुरवणे सोयीचे होणार आहे. या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. तसेच महापालिकेला वेगळे उत्पन्न मिळणार आहे. परंतु महापालिकेच्या प्रस्तावावर अद्याप सिडकोने अभिप्राय दिलेला नाही. सिडकोतर्फे टर्शरी ट्रीटमेंट प्लांट तयार करण्याचे काम प्रस्तावित आहे.
...
नवी मुंबई महापालिकेने तयार केलेले टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आता कार्यान्वित झाले आहेत. कोपरखैरणे आणि ऐरोली या प्लांटमधून एमआयडीसी आणि उद्यानांकरिता पाणीपुरवठा केला जात आहे. हेच पाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्येही इतर वापराकरिता घ्यावे, असा महापालिकेचा सिडकोसमोर प्रस्ताव आहे.
- अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com