भाताण बोगद्यात भीषण अपघात
भाताण बोगद्यात भीषण अपघात
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १५ जण जखमी
खालापूर, ता. १६ (बातमीदार) ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भाताण बोगद्यात चार वाहनांच्या अपघातात १५ जण जखमी झाल्याचे घटना मंगळवारी (ता. १५) संध्याकाळी मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर घडली.
जनार्दन उकर्डे (वय ३९, रा. संभाजीनगर), सतीश लक्ष्मण इंगवले (२४, पुणे), अभय राजेंद्र गायकवाड (३४, पुणे), तेजस्विनी दीपक गावकर (५८, मालवण), दीपक गिरीधर गावकर (६२, मालवण), संगीता सुरेश जाधव (५०, घाटकोपर), सुरेश महादू जाधव (५५, घाटकोपर), गुंडा हनुमंत कोळी (३३), अमजद पठाण (५३), रमेश नामदेव चौगुले (३६), किरण श्रीकांत पोटभरे (३५), परशुराम दत्तात्रय हेगडे (४९), लियाकत नालबंद (७५, सर्व रा. कोल्हापूर), सुनीता दत्तात्रय घुले (४४, घाटकोपर), अनिल बबन ढाकणे (३५, अजीवली पनवेल) हे १५ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ नितीन शिंदे (रा. सोलापूर) हा त्याच्या ताब्यातील टेम्पो घेऊन मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना भाताण बोगद्यात टेम्पो घसरून पलटी झाला. पलटी झालेला टेम्पो क्रेनच्या साह्याने बाजूला घेण्याचे काम सुरू असताना पाठीमागून भरधाव आलेली खासगी प्रवासी बस टेम्पोला धडकली. बसचालक सुजित चक्रवतीने अचानक ब्रेक दाबल्याने बसचा ताबा सुटून अनियंत्रित बस तीन नंबरच्या लेनवर जाऊन बोगद्याच्या भिंतीवर आदळली. त्यापाठोपाठ मिनीबसदेखील अशाच पद्धतीने अनियंत्रित होऊन बोगद्याच्या भिंतीवर आदळून अपघात झाला. जखमींना उपचाराकरिता एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, किरकोळ जखमींना उपचारानंतर सोडून देण्यात आले. बसचालक सुशील चतुर्थीविरोधात रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...
बोगद्यातील वाढते अपघात
भाताण बोगद्यातील वाढते अपघात चिंताजनक आहेत. मागील महिन्यात बांगलादेशी आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिस वाहनाचा अपघात होऊन ३० जण जखमी झाले होते. त्यानंतर एक दुचाकीस्वार बोगद्यात ठार झाल्याची घटनादेखील ३० जूनला घडली. त्यानंतर कालचा अपघात झाला. त्यामुळे बोगद्यातील व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.