‘शोले’च्या सुवर्ण पर्वानिमित्त खास नाणं प्रकाशित....
‘शोले’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष नाणे
मुंबई, ता. १६ : भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर ‘शोले’ चित्रपटाला येत्या १५ ऑगस्ट रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त भारतातील जुने चित्रपट आणि संबंधित सांस्कृतिक साहित्य जतन करणाऱ्या ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ या संस्थेने विशेष ‘शोले नाण्या’चे अनावरण केले. या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंना एकसारखी डिझाइन आहे. या नाण्याद्वारे चित्रपटातील आठवणींना नवा उजाळा देण्यात आला आहे. ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ ही संस्था जुने भारतीय चित्रपट, त्यांची ओरिजनल स्क्रिप्ट्स, पोस्टर्स आणि संबंधित दस्तऐवज जतन करण्यासह जुन्या चित्रपटांची पुनर्रचना (रेस्टोरेशन) करून विशेष स्क्रीनिंग्सही आयोजित केली जातात. यापूर्वी त्यांनी ‘मंथन’, ‘डॉन’, ‘ईशानू’, ‘गरम हवा’ यांसारख्या अनेक महत्त्वाच्या चित्रपटांची पुनर्रचना त्यांनी यशस्वीपणे केली आहे.