जिल्हा रुग्णालयात ५० रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया
जिल्हा रुग्णालयात ५० रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया
ठाणे शहर, ता. १७ (बातमीदार) : कर्करोग, हृदयविकार, गुडघ्यावरील मोठ्या शस्त्रक्रियेवर उपचार करून घेण्यासाठी मोठा खर्च येतो. तो सामान्य रुग्णांना परवडत नाही; मात्र ठाणे जिल्हा रुग्णालयाने त्यांच्याकडे दाखल झालेल्या ५० रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून त्यांच्याकडून मोफत शस्त्रक्रिया करवून घेतली. जिल्हा रुग्णालयात या शस्त्रक्रिया होत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात पाठवून त्यांच्याकडून या रुग्णांवर उपचार करून घेतले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या मदतीमुळे वर्षभरात ५० रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
जिल्हा रुग्णालयात रोज साधारण ६०० ते ७०० रुग्ण उपचारासाठी येतात. काहींवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया व उपचार नियमितपणे पार पाडले जातात. रुग्णालयात काही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा गरजू रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची कार्यपद्धती ठाणे जिल्हा रुग्णालयात यशस्वीपणे राबवली जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४ ते २०२५ या कालावधीत जिल्हा रुग्णालय, ठाणे येथून सुमारे ५० गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आले आहेत. रुग्णालयात उपचार शक्य नसलेल्या जटिल प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच धर्मादाय रुग्णालय योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांत दाखल करून त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये कर्करोगाचे पाच रुग्ण, दोन गुडघा प्रत्यारोपण हृदयविकार व संबंधित उपचाराचे तीन रुग्ण आदी इतर गंभीर आजारी रुग्णांवर डी. वाय. पाटील रुग्णालय (नेरूळ), कल्याण कॅन्सर सेंटर, बेथनी हॉस्पिटल, भक्तिवेदांत हॉस्पिटल, कौशल्य मेडिकल फाउंडेशन आदी इतर रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले.
जिल्हा रुग्णालयात माझ्या वडिलांसाठी आवश्यक उपचार शक्य नव्हते. त्यामुळे मी हताश झालो होतो, परंतु जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि त्यांच्या टीमने तत्काळ मदत केली. त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात पाठवले आणि तिथे वडिलांना मोफत आणि चांगले उपचार मिळाले, असे एका रुग्णचा मुलगा संतोष एस. याने सांगितले.
गरजू, गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय आरोग्य योजना आणि जिल्हा रुग्णालयाची सेवा-केंद्रित कार्यशैली ही अशा रुग्णांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे.
डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.