माळशेज घाटाची पर्यटकांना भुरळ

माळशेज घाटाची पर्यटकांना भुरळ

Published on

माळशेज घाटाची पर्यटकांना भुरळ
टोकावडे, ता. १७ (बातमीदार) : सह्याद्री पर्वतरांगेतील निसर्गरम्य माळशेज घाट सध्या पावसाळ्यात पर्यटकांच्या मोठ्या गर्दीने फुलून गेला आहे. पावसाळा सुरू होताच घाटात दाट धुके, हिरवाईने नटलेले डोंगर, फेसाळते शुभ्र धबधबे, ओहळ आणि घनदाट जंगल यांचे विहंगम दृश्य नजरेस पडते. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते.

माळशेज घाट १४ किलोमीटर लांब असून, त्याचा प्रत्येक वळणावर निसर्गाचे नवते दर्शन घडते. घाटातील हवामान थंड, आल्हाददायक असून, सतत पडणाऱ्या धुक्यामुळे संपूर्ण परिसर स्वर्गासारखा भासतो. या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक भेट देतात. फोटोग्राफी, निसर्गभ्रमंती, ट्रेकिंग, रॅपलिंग यासाठी घाट प्रसिद्ध आहे. विशेषतः आठवड्याच्या शेवटी शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवशी येथे मोठी गर्दी उसळते.

स्थानिक लोकांना रोजगार
माळशेज घाट परिसरात करवंद, जांभूळ, आवळा, मध, फणसाचे गरे अशा रानमेव्याच्या विक्रीसह शेवळा, गिधवड, कंटोली, आवळा यांसारख्या दुर्मिळ रानभाज्यांची चव घेण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. परिणामी, फांगुळगव्हाण, निरगुडपाडा, साखरवाडी, भोराडे, आंबेमाळी, सावर्णे, डोंगरवाडी आदी परिसरातील आदिवासी व स्थानिक लोक या नैसर्गिक संपत्तीवर आधारित विक्रीद्वारे आपला उदरनिर्वाह करत आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गालगत स्थानिकांनी लघु उद्योजकता सुरू केली आहे. चहा-नाश्त्याच्या गाड्या, फळांचे स्टॉल्स, मका कणीस भाजण्याचे दुकान चालवून चांगले उत्पन्न मिळवीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com