रस्त्यांचे डांबरणीकरण निकृष्ठ
रस्त्यांचे डांबरीकरण निकृष्ट
रस्ता दुरवस्थाप्रश्नी केडीएमसी प्रशासन कधी जागृत होणार?
कल्याण, ता. २१ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील काही मुख्य रस्त्याची महिन्यापूर्वी केलेल्या पुनर्पुष्टीकरण डांबरीकरण कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यांची पावसाळ्यात झालेली दुरवस्था पाहता हे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे.
केडीएमसी प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी कल्याणमधील मोहिंदर सिंग काबूल सिंग रस्ता, लाल चौकी पोलिस ठाणे ते पारनाका, गांधी चौक ते अत्रे रंगमंदिर, शंकरराव चौक ते टिळक चौक या रस्त्याचे पुनर्पुष्टीकरण करण्यात आले; परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या रस्त्यावर खड्डे आणि डांबर-मातीयुक्त चिखल झाल्याचा खळबळजनक आरोप माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केला असून कामाचा दर्जा कधी सुधारणार, की ठेकेदारांची बिले काढून चांगभलं करणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी केडीएमसीने सुमारे साडेसात कोटींची कामे विविध एजन्सीला दिली होती. तरी ऐन पावसाळ्यात काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांची विकासकामे सुरू आहेत. नवीन झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम पाहता पूर्वीपेक्षा यंदा खड्डे भरण्याच्या कामाचा ताण एजन्सीला कमी झाला असल्याचे जाणकरांचे मत आहे; परंतु रस्त्यावर डांबरयुक्त चिखल आणि खड्डे पाहता आणि रस्त्यावरून होणारी वाहनांची वर्दळ आणि खड्डेयुक्त रस्त्यांमुळे वाहनचालकांची तारेवरची कसरत सुरू आहे.
या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न करीत यास जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई कोण करणार, असा सवाल उगले यांनी केला आहे. याबाबत उगले यांनी आयुक्तांना पत्रदेखील दिले. या रस्त्याची गुणवत्ता, दर्जायुक्त रस्तेकामाबाबत अंमलबजावणी होणार, की प्रशासकीय राजवटीत हे भिजत घोंगडे असेच राहणार, असा खडा सवालदेखील उगले यांनी केला आहे.
वडवली ते आंबिवली रेल्वेस्थानक हा रस्ता वर्षाभरापूर्वी चांगला बनविला होता; परंतु पाणीपुरवठा वहिनी टाकणे या कामात रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. चरीभरीअंतर्गत या रस्त्याचे काम करीत मलमपट्टी केली; परंतु या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि दुरवस्थेमुळे अपघाताला आमंत्रण अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.