ठाणे महापालिकेची आदर्श पाऊलवाट

ठाणे महापालिकेची आदर्श पाऊलवाट

Published on

ठाणे महापालिकेची आदर्श पाऊलवाट
‘दिव्यांग फाउंडेशन’ची स्थापना; प्रशासकीय सभेत प्रस्ताव मंजूर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे पालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी व समस्या सोडविण्याबरोबरच त्यांना सोयी-सुविधा, योग्य उपचार मिळावे, सामाजिक दायित्व, अनुदानांच्या माध्यमातून अपंगांच्या विकासाकरिता काम करणे, यासाठी पिंपरी चिंचवड महापलिकेतील ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’च्या धर्तीवर ठाणे महापालिकेत ‘दिव्यांग फाउंडेशन’ ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावास नुकत्याच पार पडलेल्या ठाणे पालिकेच्या प्रशासकीय सभेत त्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कंपनी स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे महापालिका, आनंद दिव्यांग कल्याण फाउंडेशन किंवा ठाणे महापालिका, आनंद दिव्यांग फाउंडेशन या नावाने कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्याची स्थापना कंपनी कायदा २०१३च्या कलम ८ नुसार करून ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवली जाणार आहे.
संस्थेचे कामकाज स्वतंत्रपणे चालत असल्यामुळे ही संस्था अपंगांच्या विकासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून आपले कामकाज परिणामकारकरीत्या आणि योग्य त्या क्षमतेने करू शकते. या संस्थेच्या कामकाजामध्ये अपंगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांचा तसेच अपंग संघटनांचा तसेच अपंगांवर उपचार करणाऱ्या विविध व्यावसायिकांचा अंतर्भाव अतिशय परिणामकारकरीत्या घेता येतो. ही संस्था वेगवेगळ्या संस्थांसोबत करार करू शकते आणि त्यानुसार त्याचा फायदा दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकते.
दरम्यान, या संस्थेचे नियंत्रण हे कंपनीच्या संचालक मंडळामार्फत होणार आहे. यासाठी आठ जणांचे मंडळ असणार आहे. यामध्ये अध्यक्ष पदावर आयुक्त, उपाध्यक्ष पदावर अतिरिक्त आयुक्त-२, सदस्यांमध्ये समाजविकास विभागाचे उपायुक्त, समाजविकास अधिकारी, महापालिकेचे महापौर, महापालिकेचे उपमहापौर, महापालिकेचे स्थायी समिती सभापती, महापालिकेचे विरोधी पक्षनेता यांचा समावेश असणार आहे.
---------------------------------
संस्थेचे स्वतःचे अंदाजपत्रक
दिव्यांगांसाठीची ही कंपनी धर्मादाय अथवा चॅरिटेबल सोसायटी या पद्धतीनेसुद्धा कामकाज करणार आहे. तसेच ही संस्था महापालिकेच्या विद्यमाने स्थापन झालेली असल्यामुळे कंपन्यांचे सामाजिक दायित्व मिळवता येणे सोपे जाते. ही संस्था आपले स्वतःचे अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार महापालिकेकडून योग्य ती रक्कम अनुदान स्वरूपात मिळवू शकते आणि त्यानुसार तिचे कामकाज चालू शकते.
-------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com