शिक्षकच बनणार लिपिक

शिक्षकच बनणार लिपिक

Published on

शिक्षकच बनणार लिपिक
पहिलीच्या मुलांसाठी शिक्षकांच्या डोक्यावर २४ पानी प्रगतिपत्रकाचे ओझे
कळवा, ता. १७ (बातमीदार) : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित व या नव्या वर्षात सुरू केलेल्या पहिलीपासून सीबीएससी अभ्यासक्रमाच्या धर्तीवर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षांत होणाऱ्या परीक्षेत झालेल्या प्रगती देण्यासाठी २४ पानांचे समग्र प्रगतिपत्रक दिले गेले आहे. यामध्ये एकूण चार भाग असून विद्यार्थ्यांची माहिती, परिसराची माहिती, अभ्यासक्रमांची क्षेत्र शैक्षणिक वर्ष, सारांश अशा २० मुद्द्यांसह १५ उपघटकांची माहिती दिली आहे. त्यामुळे आधीच शाळाबाह्य सर्वेक्षण, पायाभूत चाचणी परीक्षा, निवडणूक यांद्यांचे काम, ऑनलाइन गुण भरण्याचे काम, नोंदवह्या पूर्ण करणे, संचयीपत्रक भरणे आधी कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकाला पुन्हा एकदा लिपिक बनविण्याचे धोरण नवीन अभ्यासक्रमात अवलंबले आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांची क्षमता वृद्धी करायची, त्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करायचे, की प्रत्येक विद्यार्थ्यांचे २४ पानी प्रगतिपत्रक भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. ज्या सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, त्या शाळांमध्ये मात्र हे समग्र प्रगतिपत्रक नाही; मात्र महाराष्ट्र मंडळाच्या शाळांमध्ये हे प्रगतिपत्रक दिले जात आहे.
-------------------------------------
धडे गिरवायचे कधी?
पहिलीचे मुलांचे चिमुकले वय गाणी, गोष्टी, खेळ खेळण्याचे असून नव्या अभ्यासक्रमात त्यांना परीक्षाही नाहीत त्यांना लिहिता येत नाही, असे असताना त्यांचे प्रगतिपुस्तक तयार करून या चिमुकल्यांचा अभिप्राय घेण्याचेही त्यामध्ये सुचवण्यात आले आहे. त्याच्या मित्रांचे, पालकांचे अभिप्राय, फोटो त्याची कुटुंबातील माहिती बहीण-भाऊ, कुटुंबातील एकत्रित फोटो असे अनेक मुद्द्यांची माहिती शिक्षकांना भरायची आहे. त्यामुळे त्यांना धडे कधी गिरवायचे, असा सवाल आता शिक्षकांना पडला आहे.
--------------------------------
अवघ्या चार ते पाच दिवसांचे प्रशिक्षण देऊन शिक्षण विभाग शिक्षकाला वेठीस धरत आहेत. सरकार या प्रगतिपत्रकाचे ओझे शिक्षकावर लादून पुन्हा एकदा कागदी घोडे नाचवणार, अशी चर्चा सर्वसामान्य पालकांमध्ये उमटली आहे. यामधून विद्यार्थ्यांचे बालपण हरवणार असल्याची खंत पालकांनी व शिक्षकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
--------------------------------
पहिलीच्या मुलांचे वय कमी असल्याने त्यांना व त्यांच्या पालकांना या समग्र प्रगतिपत्रकाच्या नोंदी कळणार नाहीत. त्याऐवजी गाणी, गोष्टी, खेळ याद्वारे त्यांचे निरीक्षण करण्याला महत्त्व दिले पाहिजे होते.
- प्रज्ञा मोरे, शिक्षिका
----------------------------------
सध्या सरकार नवी भरती करीत नाही, एका शिक्षकाला दोन-दोन वर्ग सांभाळावे लागतात, आता असे प्रगतिपत्रक शिक्षकांच्या माथी लादून सरकार फक्त कागदी घोडे नाचवून गोरगरिबांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतात की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
- सुधीर घागस, अध्यक्ष, शिक्षण क्रांती संघटना, महाराष्ट्र
-----------------------------------
मुलांना पुस्तकाविना मुक्त शिक्षण देण्याऐवजी शिक्षकांना प्रगतिपत्रक नोंदीत अडकवून आमच्या मुलांच्या शिक्षणाचे नुकसान करीत आहे. ही अशी शिक्षकांची लेखी कामे बंद करावी.
- मंगला शिंदे, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com