पालिकेच्या निवडणूकीसाठी पालकमंत्री लागले कामाला
पालकमंत्र्यांचा जनता दरबारांचा सपाटा
प्रभागनिहाय समस्या सोडवणार, पालिका निवडणुकीसाठीची रणनीती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : आगामी पालिका निवडणुकीसाठी अधिकाधिक राजकीय पक्षांकडून जनसंपर्क सुरू आहे. याच अनुषंगाने पालकमंत्र्यांकडून विविध प्रभागांत जनता दरबार घेतले जात असून, नागरिकांचाही त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शहर भागातील नागरिकांसाठी परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयात जनता दरबार घेतला. या उपक्रमावेळी ३०० नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. या वेळी पालिका अधिकाऱ्यांसमोरच नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यावर भर देण्यात आला. जनतेचे प्रश्न पूर्णपणे सुटत नाहीत तोपर्यंत जनता दरबार सुरू राहील, असे सहपालकमंत्री लोढा यांनी सांगितले.
-----------------------------------
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पालकमंत्र्यांवर नागरिकांच्या समस्या जाणून घेत सोडविण्याची जबाबदारी सोपविली आहे. मुंबईतील नागरिकांपर्यंत सरकारची कामे तसेच योजना राबवताना भेडसावणाऱ्या समस्या तत्परतेने सोडवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जनता दरबारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.